Panpoi
Panpoi

भामचंद्र डोंगर पायथ्याला पाणपोई सुविधा उपलब्ध

आंबेठाण - श्री क्षेत्र भामचंद्र डोंगर (ता. खेड) येथे पायथ्याशी वारकरी, विद्यार्थी, साधक व भाविक यांची पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पाणपोई बांधण्यात आली आहे. वासुली (ता. खेड) येथील कार्यकर्ते स्वर्गीय संतोष शेळके यांच्या स्मरणार्थ पंचक्रोशीतील मित्र मंडळाने संकलित केलेल्या निधीतून ही व्यवस्था करण्यात आली आहे.

जवळपास १.६७ लक्ष रूपये खर्च करून अतिशय सुंदर पाणपोई बांधण्यात आली आहे. एका वेळी दहा भाविकांना पाणी पिता येईल अशी व्यवस्था करण्यात आली असून मागील बाजूस येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने मुक्कामी राहणाऱ्या वारकऱ्यांना आंघोळीसाठी स्नानगृह करण्यात आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भामचंद्र डोंगर 'क' वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळाल्यानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या प्रादेशिक पाणी योजनेतून पाणी पुरवठा करणारी योजना १५ लक्ष रुपये खर्च करुन पूर्ण करण्यात आली आहे. त्यामूळे या पाणपोईला बारमाही पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध राहणार आहे.

स्वर्गीय संतोष शेळके यांच्या स्मरणार्थ मित्रमंडळाने उभ्या केलेल्या निधीतून गेली आठ वर्ष परिसरातील गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देखील वितरीत करण्यात आले होते. बँकांचे ठेवीवरील व्याजदर कमी झाल्याने एकत्र निधीतून ही पाणपोई बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील काही दिवसात याठिकाणी वारकरी विद्यार्थ्यांचे वर्ग आणि अद्यावत संत साहित्याचे ग्रंथालय होणार असल्याने पाणपोईचा यासाठी उपयोग होणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी सांगितले.

या पाणपोईचे काम पूर्ण करण्यासाठी अंकुश शेळके, सोमनाथ शेळके, किसन पिंजन, दत्ता लांडगे, दत्ता घुले, उद्धव महाराज यांनी विशेष मेहनत घेतली आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com