पुणे : येत्या गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद

tap.jpg
tap.jpg

पुणे : महापालिकेच्या विविध जलकेंद्र केंद्रांची देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार असल्याने येत्या गुरुवारी (ता.१४) शहरातील बहुतांश भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे, शुक्रवारी (ता.१५) कमी दाबाने आणि उशिराने पाणीपुरवठा होईल.

दरम्यान, वडगाव जलकेंद्राअंतर्गतच्या भागांत आधीच पाणीकपात असल्याने नव्या वेळापत्रकानुसार तेथील पाणीपुरवठा सुरू राहील. पर्वती जलकेंद्र (पर्वती, पद्मावती, इंदिरानगर पंपिंग), लष्कर जलकेंद्र, चतु:शृंगी, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र, नवीन होळकर या जलकेंद्रांतील महत्त्वाची कामे हाती घेण्यात येत आहेत. त्यामुळे या जलकेंद्रातून होणारा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहील.

दरम्यान, वडगाव जलकेंद्राअंतर्गत येणाऱ्या भागांतील पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद राहणार आहे. त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार या भागांना पाणी पुरविण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com