पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार

Water Supply
Water Supply

पुणे - महापालिकेच्या विविध जलकेंद्रांतील देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने येत्या गुरुवारी (ता. २) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच, दुसऱ्या दिवशी म्हणजे, शुक्रवारी (ता. ३) कमी दाबाने आणि उशिराने पाणीपुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

पर्वती जलकेंद्र (पर्वती, पद्मावती, इंदिरानगर पंपिंग), चतु:शृंगी, वारजे-एसएनडीटी, वडगाव जलकेंद्र, लष्कर जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग या जलकेंद्रांत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत; तर विद्युतविषयक कामामुळे पाणीपुरवठा गुरुवारी बंद ठेवण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com