माझ्या कामाचे कोणीही फुकटचे श्रेय घेऊ नये; वाचा काय आहे प्रकरण

टाकळी हाजी (ता. शिरूर) - येथे पुणे जिल्हा परीषदेच्या पाणी पुरवठा योजनेचे उदघाटन पुणे जिल्हा परीषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
टाकळी हाजी (ता. शिरूर) - येथे पुणे जिल्हा परीषदेच्या पाणी पुरवठा योजनेचे उदघाटन पुणे जिल्हा परीषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

टाकळी हाजी - टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील पुणे जिल्हा परीषदेची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून त्याचे उदघाटन पुणे जिल्हा परीषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांच्या हस्ते करण्यात आली. या योजनेसाठी त्यांनी स्वत-ची दोन गुंठे जागा दिली असून तत्काळ ही योजना पुर्ण करणार असल्याचे गावडे यांनी सांगितले. 

शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे मागील वर्षी पाण्याची टंचाई भासली होती. गावाला पाणी पुरवठा होण्यासाठी सरपंच दामु घोडे यांनी पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला होता. जिल्हा परिषद निधीमधून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास नाना देवकाते आणि माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या सहकार्याने या योजनेवर 25 लाख रूपयांचा निधी टाकण्यात आला आहे. यामध्ये विहीर, पाईप, लाईन, विद्युत पंप बसविण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी पंचायत समिती सदस्या अरुणा घोडे, डॉ. सुभाष पोकळे, सवित्रा थोरात, पोलिस पाटील शोभा मंदिलकर, शांताराम उचाळे, पारभाऊ गावडे, भाऊसाहेब चोरे, बन्सी घोडे, अर्जुन घोडे, अशोक गावडे, दादाभाऊ गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फुकट चे श्रेय... 
येथील जिल्हा परीषदेच्या पाणी पुरवठा योजनेसाठी माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांनी तर दुसरे जिल्हा परीषद सदस्या सुनीता गावडे यांनी उदघाटन केले होते. त्यामुळे हे उदघाटन नेमके कोणी केले या बाबत नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच पदाचा कारभार असताना मी काम मंजूर केले. माझ्या कामाचे कोणीही फुकटचे श्रेय घेऊ नये. माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांनी टाकलेली ही सोशल मिडीयावरील पोस्ट सध्या राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com