पुरंदरमधील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना घरघर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

परिंचे : पुरंदर तालुक्‍यातील दहा प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांपैकी सहा योजना बंद आहेत. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची बिकट अवस्था असून, या गावांमधून टॅंकरची मागणी केली जात आहे. 

पुरंदरमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष पाहून अनेक गावांमध्ये प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आल्या. नाझरे, कोळविहिरे, पारगाव-माळशिरस, शिवरी, धनकवडी, राख-गुळुंचे, बांदलवाडी, सुपे, दिवे, पिंगोरी अशा दहा प्रादेशिक योजना तयार करण्यात आल्या. तालुक्‍यातील 65 गावे व वाड्यावस्त्यां या योजनांना जोडण्यात आल्या.

गावातील ग्रामस्थांची समिती तयार करून या योजना गावाकडे हस्तांतरित करण्यात आल्या. सद्यस्थितीला पिंगोरी, राख-गुळुंचे, दिवे, पारगाव, धनकवडी, माळशिरस या योजना बंद आहेत. त्यामुळे 43 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. काही गावांनी जिल्हा परिषदेमार्फत नवीन पाणी योजना केल्या आहेत. पण, योजनेतील उर्वरित गावे पाण्यापासून वंचित आहेत. गावातील धनदांडग्यानी कुपनलिका खोदून स्वत:ची पाणी व्यवस्था केली आहे. सर्वसामान्य माणसाला मात्र पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. 

या योजना गावाच्या असून गावकऱ्यांनी त्या चालवायच्या आहेत. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा खर्च मोठा असतो. नियमित पाणीपट्टी भरणे हा महत्त्वाचा उपाय आहे. थकीत वीजबिलामुळे बंद असणाऱ्या योजनांना संजीवनी देण्यासाठी शासनाने थकीत वीजबिलावरील दंड व व्याज माफ करून 50% शासनाचे व 50% गावाचे पाणीपट्टी भरून योजना पुन्हा सुरू करता येतील. 
- विश्वनाथ फुलारे, शाखा अभियंता 

सर्वसामान्यांची वणवण 
तालुक्‍यातील बंद अवस्थेत असणाऱ्या प्रादेशिक योजनांनबाबत जाणून घेतले असता अनेक कारणे पुढे आली. पाणीपट्टी, थकबाकी, वीजबिल थकबाकी, भ्रष्टाचार, नियोजनाचा अभाव, दुरुस्ती खर्च मोठ्या प्रमाणात, समितीमध्ये समन्वयक नाही, श्रेयवाद ही त्यातील प्रमुख कारणे आहेत. अनेक गावांना पाणीटंचाई असूनही ती गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत असल्याने टॅंकर मिळत नाही. सर्वसामान्य नागरिकांना मात्र पाणीपट्टी भरूनही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

Web Title: Water Supply schemes in Purandar not working properly