पुणे - शिवण्यासह चार गावात आज सकाळचा पाणी पुरवठा नाही

राजेंद्रकृष्ण कापसे
सोमवार, 23 एप्रिल 2018

कोंढवे धावडे (पुणे) : कोंढवे- धावडे, शिवणे, कोपरे व उत्तमनगर या चार गावाच्या पाणी योजनेतुन सोमवारी सकाळी पाणी पुरवठा होणार नाही. अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने कळविले आहे. 

जलशुद्धीकरण केंद्रातील वीज पुरवठा रविवारी रात्री साडेअकरा वाजता खंडित झाला. तर धरणातून पाणी उचलतो त्या जकवेलच्या ठिकाणचा वीज पुरवठा देखील रात्री दीड वाजता खंडित झाला होता. त्याची माहिती रात्रीच महावितरणला देण्यात आली. परंतु रात्री वीज पुरवठा दुरुस्त केला नाही. त्यामुळे टाकीत जास्त पाणी साठले नाही. परिणामी, सकाळी पाणी पुरवठा ज्या भागाला केला जातो त्या भागाला सोमवारी पाणी पुरवठा होणार नाही.

महावितरणच्या कामगारांनी सोमवारी सकाळी काम सुरू केले आहे. त्यानंतर टाकीत पाणी जमा झाल्यानंतर सोमवारी दुपारी किंवा संध्याकाळी पाणी सोडले जाईल. अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता प्रवीण शेलार यांनी दिली.

Web Title: water supply in shivane and other four villages down