पिंपरी-चिंचवड शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मे 2019

पवना धरणातील साठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या केलेल्या नियोजनाची अंमलबजावणी सोमवारपासून (ता. ६) सुरू झाली.

पिंपरी - पवना धरणातील साठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या केलेल्या नियोजनाची अंमलबजावणी सोमवारपासून (ता. ६) सुरू झाली.

पाणीकपातीच्या काळात सर्वांना पुरेसे व समान पाणी मिळावे, यासाठी महापालिकेने एक दिवसाआड पाणीकपातीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सोमवारी किवळेगाव, रावेत, पिंपरी कॅम्प, पिंपरीगाव, पिंपळे सौदागर गावठाण, सुदर्शननगर, थेरगाव गावठाण, काळेवाडी-तापकीरनगर, श्रीनगर-रहाटणी, कुणाल आयकॉन, वाकड नंदनवन कॉलनी, गणेशनगर, प्राधिकरण सेक्‍टर २३, २६, २७, २७-अ, २८; आकुर्डी गावठाण, संभाजीनगर, शाहूनगर, त्रिवेणीनगर, सेक्‍टर ७ व १०, भोसरी गव्हाणेवस्ती, गुळवेवस्ती, इंद्रायणीनगर, सॅण्डविक कॉलनी, बोपखेल, चऱ्होली गावठाण, दिघी मॅगझीन, पांडवनगर, सद्‌गुरुनगर, खराळवाडी, म्हाडा सोसायटी, नेहरूनगर, कासारवाडी, अजमेरा कॉलनी, मोरवाडी आदी भागांत पाणीपुरवठा झाला. या भागांत पुढील काळात बुधवारी (ता. ८), शुक्रवारी (ता. १०), रविवारी (ता. १२), मंगळवारी (ता. १४), गुरुवारी (ता. १६) अशा पद्धतीने पाणीपुरवठा केला जाईल.

आज होणारा पाणीपुरवठा
मंगळवारी (ता. ७) विकासनगर, मामुर्डी गावठाण, पुनावळे गावठाण, वाल्हेकरवाडी गावठाण, ताथवडे गावठाण, प्रेमलोक पार्क, दळवीनगर, उद्योगनगर, संतोषनगर, इंदिरानगर, भोईर कॉलनी, सुखनगरी, पवनानगर, वेताळनगर, चिंचवडगाव, केशवनगर, श्रीधरनगर, सुदर्शननगर, विजयनगर, तानाजीनगर, भाटनगर, पिंपळे गुरव, भालेकरनगर, प्रभातनगर, शिवराजनगर, काटेपुरम, राजीव गांधीनगर, कासारवाडी, जवळकर चाळ, शास्त्रीनगर, केशवनगर, गुलिस्ताननगर, सांगवी कृष्णानगर, समर्थनगर, कीर्तिनगर, गणेशनगर, ममतानगर, संतूनगर, स्वामी विवेकानंदनगर, आदर्शनगर, मधुबन सोसायटी, शितोळेनगर, मुळानगर, लक्ष्मीनगर, संगमनगर, पवनानगर, ममतानगर, दत्तनगर, थेरगाव, दत्तनगर, क्रांतिवीरनगर, शिवतीर्थनगर, लक्ष्मीनगर, काळेवाडी फाटा, पडवळनगर, भूमकरवस्ती, काळा खडक, स्वामी विवेकानंदनगर, विशालनगर, पिंपळे निलख, रक्षक सोसायटी, कलाटेनगर, दत्तवाडी-आकुर्डी, फुलेनगर, रामनगर, विद्यानगर, आनंदनगर, कुदळवाडी, त्रिवेणीनगर, तळवडे गावठाण, कृष्णानगर, शिवतेजनगर, पूर्णानगर, अजंठानगर, शरदनगर, मोशी-बोऱ्हाडेवाडी, विनायकनगर, भोसरी लांडेवाडी, दिघी गावठाण, चऱ्होली-कोतवालवाडी, काळजेवाडी, पांजरपोळ, आनंदनगर, वल्लभनगर, शंकरवाडी, कुंदननगर, डुडुळगाव आदी भागांत पुरवठा होणार आहे. या भागात पुढील काळात गुरुवारी (ता. ९), शनिवारी (ता. ११), सोमवारी (ता. १३), बुधवारी (ता. १५) या पद्धतीने पाणीपुरवठा होणार आहे.

Web Title: Water Supply Shortage Pawana Dam Water Level Decrease