मुसळधार पावसातही भोरला टॅंकरद्वारे पाणीपुरवठा 

tankar
tankar

भोर (पुणे) : भाटघर धरणाच्या भिंतीच्या खाली शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या विद्युत पंपहाउसमधील जलवाहिनी सोमवारी (ता. 5) पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने शहराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या दुसऱ्या लाइनमधील जलवाहिनी फुटल्याने ती मागील आठवड्यातच बंद झालेली आहे. त्यामुळे दोन्ही जलवाहिन्या बंद झाल्याने ऐन मुसळधार पावसात नगरपालिका प्रशासनाला भोरवासीयांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. 

शहरातील नागरिकांना पाण्याची सोय करण्यासाठी नगरपालिकेतर्फे दहा टॅंकरची सोय करण्यात आली असल्याचे नगराध्यक्षा निर्मला आवारे आणि उपनगराध्यक्ष गणेश पवार यांनी सांगितले. भाटघर धरणाच्या खाली असलेल्या पंपहाउमधील 50 एचपी आणि 90 एचपी अशा दोन मोटारी असलेल्या दोन पाइपलाइनमधून शहराला पाणीपुरवठा केला जातो. मागील आठवड्यात एक पाइपलाइन फुटली आहे. तिचे काम सुरू असतानाच सोमवारी पावसाच्या पाण्यामुळे दुसऱ्या लाइनचे पाइप वाहून गेले. त्यामुळे भोरचा पाणीपुरवठा सोमवारपासून बंद आहे. मंगळवारी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दहा टॅंकरची सोय करण्यात आली असल्याचे उपनगराध्यक्ष गणेश पवार यांनी सांगितले. 

फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्याचे आणि वाहून गेलेले पाइप पुन्हा बसविण्याचेही काम युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु मुसळधार पावसामुळे त्यामध्ये अडचणी येत आहेत. पाइपलाइनचे काम पूर्ण होईपर्यंत शहरास टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. भोरवासीयांनी संयम राखून प्रशासनास सहकार्य करावे. 
- गणेश पवार, उपनगराध्यक्ष 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com