पुणे : शहरातील पाणीपुरवठ्याबाबत घेण्यात आला महत्त्वाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जानेवारी 2020

- सहकारनगर, अरण्येश्‍वरमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा 

पुणे : पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात तातडीची दुरुस्तीची कामे अचानक हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे बुधवारी (ता. 8) पुण्यातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

बुधवारी सकाळी सहकारनगर, पर्वतीदर्शन आदी भागांचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. तर काही ठिकाणी पाणी उशिरा मिळेल, असे महापालिकेने कळविले आहे. 

Image result for Water supply

तसेच अरण्येश्‍वर, तावरे कॉलनी, सहकारनगर, पद्मावती, शिवदर्शन आदी भागांत पाणी कमी दाबाने मिळणार आहे. तेथील काही ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळित होऊ शकतो. मात्र, दुरुस्तीचे काम मंगळवारी रात्री हाती घेतले. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे पालिकेने कळविले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Supply on Wednesday in Low Pressure

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: