esakal | पुणेकरांनो, शहरातील पाणीपुरवठा येत्या गुरूवारी बंद
sakal

बोलून बातमी शोधा

water supply will be closed from this Thursday in pune.jpg

ण्यात अजूनही पाऊस असताना महापालिका मात्र, पाणीकपात करीत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. शहरात अजूनही पाऊस असून, सगळी धरणे शंभर टक्के भरली आहेत. तरीही पुणेकरांना पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या प्रचंड तक्रारी आहे. धरणांत पाणी असूनही केवळ देखभाल-दुरुस्तीचे कारण देत, आठवड्यातून एक दिवस म्हणजे, दर गुरूवारी बहुतांशी भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. 

पुणेकरांनो, शहरातील पाणीपुरवठा येत्या गुरूवारी बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : विधानसभा निवडणूक आणि दिवाळीही संपताच महापालिकेने देखभालीच्या नावाखाली पाणीकपात करण्यास सुरवात केली आहे. सर्व पाणीपुरवठा केंद्रांची दुरुस्ती करावी लागणार असल्याचे कारण पुढे करीत येत्या गुरुवारी (ता.7) संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. जलकेंद्रांची देखभाल-दुरुस्तीला प्राधान्य आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. 

पुण्यात अजूनही पाऊस असताना महापालिका मात्र, पाणीकपात करीत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. शहरात अजूनही पाऊस असून, सगळी धरणे शंभर टक्के भरली आहेत. तरीही पुणेकरांना पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या प्रचंड तक्रारी आहे. धरणांत पाणी असूनही केवळ देखभाल-दुरुस्तीचे कारण देत, आठवड्यातून एक दिवस म्हणजे, दर गुरूवारी बहुतांशी भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. 

अपुऱ्या पाण्यामुळे पुणेकरांनी निवडणूक आणि दिवाळीच्या तोंडावर आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पुणेकरंना रोज पाच ते सहा तास पाणी दिले. पाठोपाठ दिवाळीतही पुणेकरांना पाणी कमी पडणार नाही, याची काळजी महापालिका प्रशासनाने घेतली. मात्र, आता निवडणूक आणि सण संपल्याने येत्या गुरुवारी पाणी बंद राहणार आहे. महापालिकेच्या पर्वती जलकेंद्रासह वडगाव, चतु:श्रृंगी, एसएनडीटी, वारजे, लष्कर केंद्र आणि नवीन होळकर पंपिंगमध्ये दुरुस्ती कामे करण्यात येणात आहेत, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.