पुणेकरांनो, पाणी जपून वापरा कारण..

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे भरल्यानंतरही महापालिकेच्या वडगाव केंद्रातर्गंत पाणीकपात सुरू आहे. त्यामुळे सिंहगड रस्त्यापासून अगदी काजत्र-कोंढव्यापर्यंत आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात भागातील लोकांचे पाण्याविना हाल सुरू आहेत. त्यावरून आंदोलनही झाली आहे.

पुणे : कात्रज, कोंढव्यासह आजूबाजूच्या भागांतील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास आणखी महिनाभराची अवधी लागणार आहे. कात्रजमधील सुमारे 30 लाख लिटर पाण्याच्या टाकीचे अंतिम टप्प्यात असून, तिला जलवाहिन्या जोडल्यानंतर वापर सुरू होणार आहे. त्यामुळे या भागांसाठी केदारेश्‍वर, कात्रजमधील टाक्‍यांमध्ये सुमारे सव्वालाख लिटर पाणी साठवता येईल. दरम्यान, नव्या टाकीचे काम पूर्ण झाल्यानंतर वडगाव जलकेंद्रातर्गंतची पाणीकपात थांबविली जाणार आहे. 

पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे भरल्यानंतरही महापालिकेच्या वडगाव केंद्रातर्गंत पाणीकपात सुरू आहे. त्यामुळे सिंहगड रस्त्यापासून अगदी काजत्र-कोंढव्यापर्यंत आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात भागातील लोकांचे पाण्याविना हाल सुरू आहेत. त्यावरून आंदोलनही झाली आहे. विशेषत: कात्रज, आणि कोंढवा (बु, खु)मधील रहिवाशांना रोज एकवेळ मात्र पुरेसे पाणी देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यातून या भागासाठी पाण्याची साठवण क्षमता वाढविण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यातर्गंत कात्रजमधील महादेवनगरमध्ये सुमारे 30 ते 35 लाख लिटर क्षमतेच्या पाण्याची टाकी उभारली आहे. 

आतापर्यंत जलवाहिन्यांमध्येच पाणी साठवून ठेवावे लागत होते. मात्र, वितरणातील त्रुटींमुळे त्यात अडचणी येऊन या भागांमधील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याच्या आहेत. परंतु, पुढील महिनाभरात नव्या टाकीतून पाणी सोडण्याची सोय केल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water supply will become smooth after a month for Katraj kondhwa area of Pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: