टॅंकर लॉबीमुळे झाली मुठा कालवा फुटी ?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

पुणे : मुठा कालवा फुटीचे खापर उंदीर, घुशींवर फोडणाऱ्या जलसंपदा विभागाने आता कालव्यालगतच्या जमिनीत अनधिकृत बोअरवेल घेऊन टॅंकर लॉबी पाणीपुरवठा करत आहे का, याची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. कालवा फुटीची कारणे शोधण्यासाठी नेमलेल्या समितीला तसा आदेश दिला असून, 15 डिसेंबरपर्यंत या विषयीचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्याचा आदेश दिला आहे. 

दांडेकर पूल येथे मुठा कालवा फुटलेल्या घटनेची कारणे शोधण्यासाठी व अशा घटना पुढे घडू नये, यावर उपाययोजना सुचविण्यासाठी राज्य शासनाने पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. सप्टेंबर महिन्यात दांडेकर पूल येथे मुठा कालवा फुटल्याची दुर्घटना घडली होती. यामध्ये अनेक नागरिकांचे संसार वाहून वाहून गेले. या घटनेनंतर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी करून कालवा फुटीबाबतची कारणे शोधण्यासाठी समिती स्थापन केली होती. त्यानुसार जलविद्युत व गुण नियंत्रण विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. 

कालवा फुटीची घटना घडताच जिल्हाधिकारी कार्यालय व पुणे महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तत्काळ कार्यान्वित झाली का, तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने काय कार्यवाही केली, ती योग्य होती काय, याची तपासणी ही समिती करणार आहे. समितीस लागणारी आवश्‍यक माहिती महापालिका आणि जलसंपदा विभागाने उपलब्ध करून द्यावी, तसेच समितीने सुनावणीस अथवा माहितीसह बोलविल्यास संबधितांनी उपस्थित राहावे, अशा सूचनाही शासनाने दिल्या आहेत. 
 
Web Title: Is water tanker lobby behind canal breach?