पुणे जिल्ह्यात ४१ गावांत अद्यापही टँकरने पाणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

पुणे जिल्ह्यातील ४१ गावे आणि ३२७ वाड्या-वस्त्यांना अद्यापही पिण्याचे पाणी मिळण्यापुरतेही उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे या गावांना आणि वाड्या-वस्त्यांना ५० टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे. 

पुणे - चालू वर्षातील पावसाळा संपत आला, तरीही जिल्ह्यातील ४१ गावे आणि ३२७ वाड्या-वस्त्यांना अद्यापही पिण्याचे पाणी मिळण्यापुरतेही उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे या गावांना आणि वाड्या-वस्त्यांना ५० टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे. 

या सर्व गावांमधील मिळून १ लाख १ हजार ७६१ लोकसंख्या ही तहानलेलीच आहे. जिल्ह्यातील तेरापैकी बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड आणि आंबेगाव या पाच तालुक्‍यांत टॅंकर सुरू असून, उर्वरित आठ तालुके मात्र टॅंकरमुक्त झाले आहेत. यामध्ये शिरूर, खेड, जुन्नर, मावळ, मुळशी, हवेली, भोर आणि वेल्हे या तालुक्‍यांचा समावेश असल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून सोमवारी सांगण्यात आले.

बारामती तालुक्यात  १५ टँकर
जिल्ह्यात सर्वाधिक १५ टॅंकर बारामती तालुक्‍यात सुरू असून, त्यापाठोपाठ इंदापूर तालुक्‍यात १४, पुरंदरमध्ये ११, दौंडमध्ये नऊ आणि आंबेगाव तालुक्‍यात एक टॅंकर सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water by tanker in Pune district