आठ लाख लोकांना टॅंकरने पाणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

पुणे - यंदा पुणे विभागात बहुतांश भागांत दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. मार्चच्या मध्यास या विभागातील कोल्हापूर वगळता पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या चार जिल्ह्यांत आठ लाख नागरिकांना ३७८ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, मावळ आणि मुळशी हे चार तालुके वगळता ४२ गावे आणि ४९१ वाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांमधील सुमारे दीड लाख नागरिकांची तहान भागविण्यासाठी ७८ टॅंकर सुरू केले आहेत. 

सातारा जिल्ह्यात ९२ टॅंकर
सातारा जिल्ह्यात ९२ टॅंकर सुरू आहेत. तेथील ९२ गावे आणि ४३५ वाड्यांमधील एक लाख ६३ हजार नागरिकांना टॅंकरने पाणी दिले जात आहे. याठिकाणी जनावरांचा चारा आणि पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.   

सांगली जिल्ह्यात १०८ टॅंकर
सांगली जिल्ह्यात सर्वाधिक ११३ गावे आणि ७६९ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी १०८ टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. तेथील सुमारे अडीच लाख लोकांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर सोलापूर जिल्ह्यात टॅंकरने शतक गाठले आहे. ९८ गावे आणि ७१७ वाड्यांमधील सव्वादोन लाख नागरिकांना शंभर टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

Web Title: Water Tanker Water Shortage