पाणी काटकसरीनेच वापरा

Pawana-Dam-Water
Pawana-Dam-Water

पिंपरी - शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असला, तरी तो जास्त दाबाने होत असल्यामुळे नागरिकांच्या त्यासंदर्भातील तक्रारी कमी झाल्या आहेत. तरीही, नागरिकांनी पाणी काटकसरीने आणि कार्यक्षमतेने वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील साठा कमी झाल्याने महापालिकेने पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुरवातीला कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे शहरातील अनेक भागांत पाणी पोचण्यात अडचणी येत होत्या. सध्या शहरात जास्त दाबाने पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांकडून तक्रार येणे कमी झाले आहे. उलट शहरातील काही नागरिकांनी पाणीकपात कायम ठेवण्याची सूचना महापालिकेला केली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

अनेक नागरिकांना पाणी प्रश्‍नाचे गांभीर्य जाणवले असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले. मात्र, तरीही नागरिकांनी वैयक्तिक पातळीवरही उपलब्ध पाणी अधिक काटकसरीने आणि कार्यक्षमतेने वापरल्यास पाणीकपातीचा मूळ उद्देश सफल होईल, असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पवना धरणातील सद्यःस्थिती
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात जिवंत पाणीसाठा २१.३५ टक्के (१.८२ दशलक्ष घनमीटर) शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. पवना धरणाची साठवण क्षमता ९.६० दशलक्ष घनमीटर आहे.

त्यापैकी १.१ दशलक्ष घनमीटर मृतसाठा आहे. आजपर्यंत हा साठा वापरण्यात आलेला नाही. शहराला १५ जुलैपर्यंत पाणी पुरेल यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. यंदा १५ जुलैनंतरही पाऊस लांबला, तर हा साठा वापरावा लागणार आहे. मात्र, या मृतसाठ्यातील उपलब्ध पाण्यामध्ये गाळ किती आहे, याबाबत सध्या सांगता येणे शक्‍य नसल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या धरणात उपलब्ध असणाऱ्या पाणीसाठ्यापैकी महापालिका रोज ०.३ टक्के म्हणजे सुमारे ४८० दशलक्ष लिटर पाणी उचलते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com