‘भामा आसखेड’तून नदीत विसर्ग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

आंबेठाण -  भामा आसखेड (ता. खेड) धरणातून भामा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. तालुक्‍यातील काळूसपर्यंत असणारे बंधारे भरण्यासाठी हे पाणी सोडण्यात आल्याची माहिती भामा आसखेड प्रकल्प सिंचन व्यवस्थापन विभागाचे शाखा अभियंता भारत बेंद्रे यांनी दिली आहे.

सध्या धरणात ३३.६६ टक्के पाणीसाठा आहे. पाण्याची मागणी लक्षात घेऊन आयसीपीओमधून ३०० क्‍युसेस वेगाने हे पाणी भामा नदीत सोडण्यास आज (ता.२८) सायंकाळी सुरवात करण्यात आली. काळूसपर्यंत असणारे सहा बंधारे भरण्यासाठी या आवर्तनाचा फायदा होणार आहे. आजपर्यंत धरण क्षेत्रात १२९४ मिली पावसाची नोंद करण्यात आली आहे. सध्याची पाणी पातळी ६५९.४३ मीटर इतकी आहे. काळूसगावापर्यंत असणाऱ्या बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी झाल्याने आणि त्यामुळे विविध गावच्या पाणी योजना तसेच शेतपिकांचे नुकसान होऊ नये, म्हणून पाणी सोडण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन केले आहे.

Web Title: Water was released into the Bhama river from Bhama Asakhed dam