पिंपळगाव जोगा धरणातून कालव्यामार्गे पाण्याचा विसर्ग सुरू

पिंपळगाव जोगा धरणातून कालव्यामार्गे पाण्याचा विसर्ग सुरू

ओतूर : पिंपळगाव जोगा धरणातून कालव्यामार्गे पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पिंपळगाव जोगा (ता. जुन्नर) धरणातून कालव्यामार्गे सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे ओतूर परीसरात कालव्याच्या गळतीने कालवा फुटण्याची शक्यता आहे. पिंपळगाव जोगा धरणातून कालव्यामार्गे उन्हाळी पिकांसाठी २२० क्यूसेसने पाण्याचे आवर्तन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार जुन्नर व पारनेर तालुक्यासाठी सोडण्यात आले आहे.  मात्र कालव्याची ठिकठिकाणी दुरावस्था झाली असल्याने ओतूर व परिसरात पिंपळगाव जोगा धरणाचा कालवा फुटीचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

याबाबत कुकडी पाटबंधारे विभागाला माहीती कळविल्यानंतर कालवा तपासणी पथकाने या परीसरात पाहणी केली. यावेळी पथकाबरोबर जुन्नर पंचायत समितीचे सभापती विशाल तांबे, जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, सरपंच गिता पानसरे, ग्रामपंचायत सदस्य गोरक्ष फापाळे,संचित फापाळे, प्रशांत डुंबरे, दयानंद डुंबरे, महेंद्र पानसरे, संतोष पानसरे, सुनिल पानसरे, योगेश गाढवे, गजानन पानसरे, सागर डुंबरे, विक्रम अवचट हे इतर शेतकरी उपस्थित होते.

दरम्यान, त्यांनी कालव्याच्या पाण्यातील गळतीमुळे परीसरातील शेतात मध्ये पाणीसाठून शेतीचे मोठे नुकसान होत असून, तीन ते चार ठिकाणी कालवा फुटीचा मोठा धोका असल्याचे पथकाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच निमानपोही ओढ्यात कालव्याची दगडी भिंत कोसळू लागली असून, वेळीच डागडुजी व इतर उपाययोजना न केल्यास या ओढ्यात कालवा फुटण्याची मोठी शक्यता असल्याचे निदर्शनास आणून दिले.

सदर कालवा तपासणी पथकाने याबाबत वरीष्ठ कार्यालयात माहिती दिली. त्या नुसार कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१ चे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक कार्यकारी अभियंता सुचिता डुंबरे यांनी शाखा अभियंता सी. डी. सोमंवशी, मधुकर दीघे, यू. व्ही. भोर, डी. एल. पटेल, शंकर बेनके व इतर कर्मचार्यांनी कालवा फुटीच्या संभाव्य ठिकाणावर तसेच मोठ्या प्रमाणात गळती होत असलेल्या भागात त्वरीत जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने मुरूम आणि माती टाकून कालव्याची डागडुजी करण्याचे काम सुरू केले. 

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com