Video : कात्रजमध्ये जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

कात्रज चौकात राजीव गांधी पंपींग स्टेशन ते कोंढवा येथील केदारेश्वर पाण्याच्या टाकीकडे जाणारी चार फूट व्यासाची जलवाहिनी फूटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

पुणे : कात्रज चौकात राजीव गांधी पंपींग स्टेशन ते कोंढवा येथील केदारेश्वर पाण्याच्या टाकीकडे जाणारी चार फूट व्यासाची जलवाहिनी फूटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी देखील झाली आहे.

कात्रज कोंढवा रस्त्याच्या रूंदीकरणाचे कामात जेसीबीने खोदाई सुरू होती. अचानक जलवाहिनी फुटल्याने प्रचंड दाबाने पाणी तब्बल पाचशे फूट लांब फेकले गेले. पाणी पुरवठा विभागाला माहिती दिल्यानंतर पाणी बंद करण्यात आले. 

दरम्यान, कात्रज कोंढवा मार्गावरील वाहतूक खोळंबली. वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. परंतू चार किलोमीटर अंतरातील या मोठ्या जल वाहिनीतील पाणी मागे उताराने तासभर  वाहून वाया गेले.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water waste due to pipeline leakage at katraj of pune