अरे बापरे ! नागरिकांच्या आरोग्याशी केला जातोय खेळ; नवीन मुळा-मुठा कालव्यात सोडल जातयं सांडपाणी

water.jpg
water.jpg

हडपसर (पुणे) : नवीन मुळा-मुठा कालव्यात विना परवाना परिसरातील सांडपाणी व घनकचरा टाकण्यात येत आहे. शेतीकरिता कालव्याद्वारे सोडण्यात येणारे पाणी अतिशय दुर्गंधीयुक्त आणि आरोग्यास हानिकारक असल्याने कालव्यालगतच्या गावांतील पाणी पुरवठा योजनांवरही याचा परिणाम झाला आहे. हे पाणी दूषित असल्यामुळे कालव्या लगत असलेल्या विहिरी, कुपनलिकांतील आणि हातपंपाचे पाणीही खराब झाले आहे. पिकांना पाणी वापरले तरी त्याचा परिणाम पिकांवरही दिसून येत आहे. त्यामुळे आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत नागरिकांकडून मागणी होत आहे.

याबाबत डाॅ. संजय नाईक म्हणाले, कालव्यातून पिकांना सांडपाणी देण्यामुळे माणसाला रोग होऊ शकतात. त्यात गॅस्ट्रोचा व अतिसाराचा समावेश आहे. अनेकदा शेतकरी सांडपाण्यावर पिके वाढवतात, पण ते आरोग्यास धोकादायक असते. पिकांना सांडपाणी देण्यामुळे आजार होऊ शकतात. त्यात गॅस्ट्रोचा व अतिसाराचा समावेश आहे. अनेकदा शेतकरी सांडपाण्यावर पिके वाढवतात. सांडपाण्यात अनेक रासायनिक द्रव्ये सोडण्यात येतात. त्याचा विपरीत परिणाम मानवाच्या आरोग्यावर होतो. याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

नागरिक नितीन आरू म्हणाले, हडपसर येथून वाहणा-या नवीन कालव्यात नागरिकांकडून अवैधरित्या सांडपाणी सोडण्यात आले आहे. तसेच कालव्यात घनकचरा देखील मोठया प्रमाणात पडला आहे. खुद्द महापालिकेने व अनेक सोसायटयांनी देखील पाईपद्वारे सांडपाणी कालव्यात सोडले आहे. त्यामुळे कालव्याचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे कालव्या लगत असलेल्या विहीरी, हातपंप आणि कुपनलिकांमधून दूषित पाणी येत आहे. महिनाभरात पाटबंधारे विभागाने व महापालिकेने यावर उपाययोजना केल्या नाहीत, तर अधिका-यांना सांडपाण्याने आम्ही अंघोळ घालणार आहोत.

खडकवासला पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता पोपटराव शेलार म्हणाले, कालव्यात सांडपाणी सोडणे हे नियमबाह्य आहे. त्यामुळे तातडीने हडपसर शाखा अभियंत्याना कालव्याची पाहणी करण्याची तातडीने सूचना दिली जाईल, तसेच संबधित व्यक्ती अथवा संस्थेवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. महापालिकेकडून कालव्यात सांडपाणी सोडले असेल तर हडपसर सहाय्यक आयुक्तालयांवर देखील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हडपसर सहाय्यक आयुक्त कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त वैभव कडलक म्हणाले, मी नव्यानेच पदाचा कार्यभार घेतला आहे. दोन दिवसात कालव्याची अधिका-यांसमवेत पाहणी करण्यात येईल. महापालिकेकडून कालव्यात पाणी सोडले असेल तर ते तातडीने बंद करण्यात येईल.


       उपाययोजना :

  • कालव्यात घनकचरा व सांडपाणी सोडणा-यांवर कायदेशीर कार्यवाही करावी.
  • कालव्याच्या दुतर्फा नागरिकांनी कचरा टाकू नये यासाठी तारेचे कंपाउंड टाकावे.
  • नागरिकांचे प्रबोधन करावे.
  • तातडीने कालव्यात सोडलेले पाणी बंद करावे.
  • कालव्यातील घनकचरा काढावा.

Edited by- Gayatri Tandale

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com