वीस वारकऱ्यांसमवेत संत सोपानदेवांच्या पादुका पंढरीकडे मार्गस्थ

श्रीकृष्ण नेवसे    
मंगळवार, 30 जून 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सासवड (ता.पुरंदर) येथील श्री. संत सोपान महाराजांचे मंदीर अनेक दिवसांनी पंढरीच्या प्रस्थानासाठी व आज पादुका मार्गस्थ करण्यासाठी  थोडे खुले झाले. आज वीस वारकऱ्यांसह पंढरीकडे सोपानदेवांच्या पादुका मार्गस्थ झाल्या. 

wari 2020 सासवड, (जि. पुणे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सासवड (ता.पुरंदर) येथील श्री. संत सोपान महाराजांचे मंदीर अनेक दिवसांनी पंढरीच्या प्रस्थानासाठी व आज पादुका मार्गस्थ करण्यासाठी  थोडे खुले झाले. आज वीस वारकऱ्यांसह पंढरीकडे सोपानदेवांच्या पादुका मार्गस्थ झाल्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आमदार संजय जगताप, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, देवस्थानचे अध्यक्ष व मुख्य विश्वस्त ह.भ.प. गोपाळ महाराज गोसावी, श्रीकांत गोसावी आदी उपस्थित होते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर फिजीकल-डिस्टंन्सिंग ठेवूनच वारकऱ्यांनी परंपरा जपली. एसटी बसमधून पादुका केवळ वीस जणांसह रवाना झाल्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, पहाटे संत सोपानदेव मंदिरातील समाधीवर अभिषेक झाला. अगोदरच पारंपरिक पद्धतीत सोपानदेवांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा 18 रोजी झाला होता. आज शासन परवानगीनुसार वारी वैष्णवांच्या संख्येने सिमित होऊन पंढरीकडे निघाली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the way to Saint Sopandeva's Paduka Pandharpur