सर्वांगीण विकासाच्या कामासाठी सदैव कटिबद्ध : खा. सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

वडापुरी : बारामती लोकसभा मतदारसंघ तसेच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले राष्ट्रीय नेते शरद पवार यांचे राज्याच्या राजकारणात महत्वपूर्ण स्थान आहे , त्यामुळे निवडणूकी पुरते राजकारण व निवडणूकी नंतर विकास कारण हे त्यांचे तत्व आहे त्या तत्वानुसार सर्व सामान्य माणूस विकासाचे केंद्र बिंदू माणून या मतदारसंघात कोट्यावधीची काम केले आहे तसेच या पुढे सुद्धा वडापुरी परिसरातील सर्वांगीण विकासाच्या कामासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

15 आॅगस्ट रोजी खासदार सुप्रियाताई सुळे यांचा इंदापुर तालुक्यातील भांडगाव, बेडशिंगे, भाटनिमगाव, अवसरी, वडापुरी असा गावभेट दौरा झाला त्यावेळी वडापुरी येथील आयोजित केलेल्या सभेत सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

सुळे पुढे म्हणाल्या कि काटी जिल्हा परिषद गटात अभिजीत तांबिले यांनी या जिल्हा परिषद गटात एका वर्षात अडीच कोटी रूपयाचा निधी आणून विकास कामे केली असून कमी वयात सर्वात जास्त विकास कामे केली असल्याने तांबीले यांनी केलेल्या विकास कामाचे कौतुक केले. बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने व जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबीले यांनी वडापुरी ते अवसरी रस्त्यासाठी 35 लाख, दलितवस्ती अंतर्गत रस्ते कॉंक्रीटीकरण 12 लाख निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून  मंजूर झाले असल्याचे सांगितले. यावेळी आमदार दत्तात्रेय भरणे, पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने, इंदापूर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष महारूद्र पाटील, कार्याध्यक्ष अमोल भिसे, रेहाना मुलानी, सचिन सपकळ ,अॅड.शुभम निंबाळकर, राजेंद्र तांबिले, पंचायत समिती सदस्य सतिश पांढरे, सरपंच योगीता काळे, हनुमंत जगताप, अप्पासाहेब बंडगर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तय्यबभाई शेख यांनी केले तर आभार दयानंद चंदनशिवे यांनी मानले. 
 
Web Title: we are always ready for development work said supriya sule