आपल्यावर हिंदुत्ववादी राज्य करत नसून माफिया राज्य करत आहेत - डॉ. कुमार सप्तर्षी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dr kumar saptarshi

‘आताची आणीबाणी फार वेगळी आहे. या आणीबाणीत माफियागिरी आहे. या देशात माणसे मारण्याचा पद्धतशीर उद्योग चालू आहे.

आपल्यावर हिंदुत्ववादी राज्य करत नसून माफिया राज्य करत आहेत - डॉ. कुमार सप्तर्षी

पुणे - ‘आताची आणीबाणी फार वेगळी आहे. या आणीबाणीत माफियागिरी (Mafia) आहे. या देशात माणसे मारण्याचा पद्धतशीर उद्योग चालू आहे. सत्य बोलणाऱ्यालाच जीवाला जपावे लागत असेल, तर समाजात मोठा बिघाड झाला आहे. आपल्यावर हिंदुत्ववादी राज्य करत नसून माफिया राज्य करत आहेत’, असे परखड मत महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी (Dr Kumar Saptrshi) यांनी सोमवारी व्यक्त केले.

ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले लिखित ‘हू किल्ड जज लोया?’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सप्तर्षी आणि राज्याचे माजी विशेष पोलिस महासंचालक एस. एम. मुश्रीफ यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी गांधी स्मारक निधीचे विश्वस्त डॉ. मच्छिंद्र गोरडे, युक्रांदचे संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर, अप्पा अनारसे तसेच अन्वर राजन, डॉ. प्रवीण सप्तर्षी, सुनीती सु. र., गोपाळ तिवारी, प्रशांत कोठडिया, विकास लवांडे, प्रसाद झावरे, श्रीरंजन आवटे आदी उपस्थित होते.

निरंजन टकले म्हणाले, ‘न्या. ब्रिजगोपाल लोया यांच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणावर बातमी करण्यासाठी माहिती मिळविताना खूप धमक्या आल्या, भीती दाखवली गेली. हे पुस्तक प्रकाशित करतानाही अनेक प्रकाशकांनी नकार दिला. न्या. लोयांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणातील माहिती लपवली गेली. जर हृदयविकाराने लोयांना मृत्यू आला होता तर कपडे रक्ताने का माखले होते? लोयांना आर्थोपेडिक हॉस्पिटलला का नेण्यात आले? मृत्यूची जी वेळ दाखवली गेली, त्याआधीच नातेवाईकांना मृत्यूची बातमी का कळवली? मृतदेह लातूरला का नेला गेला? जे न्यायाधीश लोयांसह मुंबई ते नागपूर प्रवासात होते, ते मृत्यूनंतर लोयांच्या नातेवाईकांना लगेच सांत्वनासाठी का भेटले नाहीत?, असे अनेक गूढ प्रश्न न्या. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूमागे आहेत.’ संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले. अप्पा अनारसे यांनी आभार मानले.

Web Title: We Are Not Ruled By Pro Hindu People But By Mafia Dr Kumar Saptarshi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneHindu religion
go to top