आम्ही आजूनही उपरेच...

प्रवीण खुंटे 
रविवार, 29 जुलै 2018

पुणे :"आमचा प्रमुख व्यवसाय खेडक्‍या, मासे पडकणे आणि विकणे. ते जर भेटले तर रात्री आम्ही जेवतो नाहीतर उपाशीच झोपतो. पावसापाण्यात असचं आम्हाला उघड्यावर, घाणीत जगावे लागत असून आता जगणही अवघड झाले आहे. यासाठी शासनानी आमच्याकडे लक्ष देऊन काहीतरी करावे.'' आदिवासींमधील 'कातकरी' समाजाचे दगडू हिलम यांनी "सकाळ'शी बोलताना त्यांच्या प्रश्नांचा पाढा वाचून दाखवला. आजूनही आम्ही उपरेच असल्याचे त्यांचे म्हणणे होते.

पुणे-बेंगलोर महामार्गावरील नसरापूर (चेलाडी) फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला मागील 60 वर्षांपासून राहणाऱ्या कातकरी समाजाची परिस्थिती आजूनही तशीच आहे. अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात येणाऱ्या या समाजासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. परंतु, यातील एकही योजना या वस्तीपर्यंत पोहचली नाही. 

गवताच्या झोपड्या, जमिनीवरील ओल, चिखल, दुर्गंधी, मुसळधार पाऊस, रस्ता नाही, शौचालय नाही, घरात गॅस नाही, शिक्षण आरोग्य काही नाही. अशात चिखलात मिरवणारी लहाण मुले, पोटाची खळगी भरण्यासाठी ओढ्याच्या काठाने फिरणारे पालक. एकूणच जगण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या गरजांचा संपुर्ण अभाव असे भीषण चित्र या कातकरी समाजाच्या वाडीवर आहे. 

आमच्या एकूण पस्तीस झोपड्या आहेत, त्यातील एकाही झोपडीत गॅस नाही. आम्हाला चुलीवरच स्वयंपाक करावा लागतो. पावसाळा असल्यामुळे सरपणही मिळत नाही. सगळीकडे ओल असते त्यामुळे लहान मुलं लवकर आजारी पडतात. इथे दवाखान्याचीही सोय नाही. 
- एक कातकरी महिला 

प्रमुख समस्या 
साठ वर्षापासून राहतात पण गुंठाभरही जमीन नाही. घरे नाहीत, रस्ता नाही, लहान मुलांसाठी अंगणवाडी, प्राथमिक शाळा लांब आहे. सात-आठ वर्षाची मुले शाळेत जाण्यासाठी महामार्ग ओलांडू शकत नाही. 

आम्हाला स्वतःचे घर पाहिजे. यासाठी साठ वर्षापासून ज्या जागेवर राहतो ती जागा आमच्या नावावर नाही. आम्ही अनेक वर्षांपासून याची मागणी करत आहोत. कोणीच आमची दखल घेत नाही. 
दगडू हिलम, माजी ग्रामपंचायत सदस्य, नसरापूर 

Web Title: we are uncared for society