आम्ही मतं मागतो अन्‌ ते पैसे मागतात - बापट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

पुणे - ‘‘लोकांकडून पैसे नव्हे तर, आम्ही मते मागतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे पैसे मागतात. त्यामुळे त्यांना दुसरा विषय सूचत नाही.

पुणे - ‘‘लोकांकडून पैसे नव्हे तर, आम्ही मते मागतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे पैसे मागतात. त्यामुळे त्यांना दुसरा विषय सूचत नाही.

मुख्यमंत्र्यांच्या सभेवरून पवार यांनी केलेला आरोप हास्यास्पद आहे, अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश बापट यांनी पवार यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
शनिवारवाड्याच्या आवारात महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या १४८ फूट उंचीच्या राष्ट्रध्वजाचे उद्‌घाटन बापट यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, भाजपचे गटनेते गणेश बिडकर, नगरसेविका मुक्ता टिळक, हेमंत रासने, दिलीप काळोखे, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप उपस्थित होते.

बारामतीमधील एका जागेचे आरक्षण उठवण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी पन्नास लाखाची मागणी केल्याचा आरोप अजित पवार यांनी केला होता. त्यावर बापट म्हणाले, ‘‘विकासाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी आम्ही मते मागतो. उलटपक्षी पवार हे पैसे मागत असतात. त्यामुळे पैशांशिवाय त्यांना इतर विषय सूचत नाहीत. नगरपालिकांच्या निवडणुकीत राज्यात भाजपला मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती पुणे जिल्ह्यात होईल. या निवडणुकीच्या निकालानंतर पक्षाची ताकद वाढणार आहे. काही ठिकाणी पक्षाच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली असून जिल्ह्यात पक्षाचा विस्तार होईल.’’

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा विषय कानावर आहे. मात्र, त्याबाबत चर्चा होऊन पक्ष निर्णय घेईल. उगाचच कोणाचाही पक्षप्रवेश होत नाही, असेही बापट यांनी स्पष्ट केले.

Web Title: We ask for votes and to ask for money