ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना राबविणार - बडोले

शुभारंभ लॉन्स - "ज्येष्ठोत्सव' कार्यक्रमात ज्येष्ठ मान्यवरांचा सत्कार राजकुमार बडोले, दिलीप कांबळे आदींच्या उपस्थित करण्यात आला.
शुभारंभ लॉन्स - "ज्येष्ठोत्सव' कार्यक्रमात ज्येष्ठ मान्यवरांचा सत्कार राजकुमार बडोले, दिलीप कांबळे आदींच्या उपस्थित करण्यात आला.
पुणे - 'राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या ज्येष्ठ नागरिक धोरणातील आर्थिक योजना राबविण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल,'' असे आश्‍वासन पुन्हा एकदा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.

सामाजिक न्याय विभाग आणि ऍस्कॉप संस्थेतर्फे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त "ज्येष्ठोत्सव : 2018' या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बडोले बोलत होते. समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, संयोजिका आमदार प्रा. मेधा कुलकर्णी उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिक धोरणातील विविध योजनांची माहिती देऊन ज्येष्ठांना एसटी तिकिटामध्ये सवलत देण्याचा निर्णय लवकरच घेऊ, असे बडोले यांनी सांगितले. समाजात वावरणाऱ्या प्रत्येकाला ज्येष्ठांचा आदर वाटतो. त्यांचे अनुभवन व ज्ञान समाजाला मार्गदर्शक असते, असे मत खासदार शिरोळे यांनी व्यक्त केले.

इतिहासाचे अभ्यासक प्रा. शां. ग. महाजन, अभिनेते डॉ. मोहन आगाशे, अभिनेत्री दीपा लागू, निवेदक सुधीर गाडगीळ, अभिनेते माधव वझे, व्यंगचित्रकार शि. द. फडणीस, माध्यम विश्‍लेषक अभिनंदन थोरात, माजी अधिकारी वसंत म्हस्के, कवयित्री अरुणा ढेरे, कथक नृत्यांगना मनीषा साठे, कवयित्री प्रतिभा शाहू मोडक, प्रसारमाध्यम तज्ज्ञ विश्‍वास मेहेंदळे, गझलकार म. भा. चव्हाण, हास्यक्‍लबचे मकरंद टिल्लू आणि वयाची शंभरी पूर्ण करणाऱ्या नलिनी देवधर यांना "पुण्याचा अभिमान' पुरस्काराने सन्मान केले. ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध स्पर्धा, विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर, बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री आदी कार्यक्रमाचेही या वेळी आयोजन करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com