पुण्याच्या गुंठेवारीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ

महमंदवाडी येथे भानगिरे रुग्णालय व घुले मंडईचे लोकार्पण
eknath shinde
eknath shindesakal media

उंड्री : स्वतंत्र महापालिकेबाबत कोणताही प्रस्ताव नाही, पुण्याच्या गुंठेवारीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. तसेच लखीमपुरा येथे शेतकऱ्यांना चिरडल्याप्रकरणी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्र बंदमध्ये सर्व पक्ष सहभागी होणार आहेत, असे नगरविकास तथा बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

eknath shinde
Dream 11 अ‍ॅप गोत्यात, गुन्हा दाखल; जाणून घ्या काय घडलं?

महंमदवाडी येथे कै. दशरथ बळीबा भानगिरे रुग्णालय, कै. मधुकर रंगुजी घुले (पाटील) भाजी मंडई, तसेच सुमारे 5 कोटी रुपये निधीतून तुकाई दर्शन ते साई विहार नेहरू पार्कला जोडणाऱ्या जलवाहिनीचे काम, पालखी रस्ता, कलव्हर्ट विकसित करणे व सर्व्हे नं 17, 18 येथून जाणाऱ्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा मंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, संपर्कप्रमुख सचिन आहिर, माजी राज्यमंत्री विजयबापू शिवतारे, सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, पालिका आयुक्त विक्रम कुमार, पालिका गटनेते पृथ्वीराज सुतार, जिल्हाप्रमुख विजय देशमुख, शहरप्रमुख संजय मोरे, नगरसेविका प्राची आल्हाट, उपशहरप्रमुख समीर तुपे, राजेंद्र बाबर, नीता भोसले, सारिका डाळिंबकर, अभिमन्यू भानगिरे आदी मान्यवर उपस्थित होते.

eknath shinde
Power Crisis: "भाजपला सरकार चालवता येत नाहीए"; सिसोदियांचा प्रहार

यावेळी मंत्री शिंदे यांच्या हस्ते डॉ. दिलीप माने, डॉ. सचिन आबने, डॉ. मंगेश वाघ, डॉ. अशोक जैन, डॉ. राज कोद्रे, डॉ. पुनम कोद्रे, डॉ. श्रुती गोडबोले, डॉ. वंदना आबने, डॉ. मनीषा सोनवणे डॉ. सतीश सोनवणे, डॉ. नितीन नेटके, डॉ. संपत डुंबरे पाटील यांचा विशेष कोविड-१९ योद्धा म्हणून गौरव करण्यात आला.

मंत्री शिंदे म्हणाले की, शिवसेना पक्ष निवडणुकीआधी वचननामा प्रकाशित करून ९५ टक्के कामे पूर्ण करून दाखवते. म्हणूनच मतदार पुन्हा शिवसेनेला मतदान करतात. नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी मूलभूत प्रश्न सोडविण्याबरोबर आरोग्यासाठी रुग्णालय उभारले, लोकांना न्याय देण्याचे काम केले, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण त्यांनी आत्मसात केली, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

दरम्यान, नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज आदी कामांबरोबर येथील नागरिकांसाठी आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी रुग्णालय उभारले आहे. तसेच नागरिकांची गरज ओळखून भाजीमंडई सुरू केली आहे. उद्यान, विरंगुळा केंद्र, पालखी मार्ग, कलवर्ट आदी कामे प्रगती पथावर असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com