Vidhan Sabha 2019 : कॅन्टोन्मेंटमध्ये 25 हजारांहून जास्त मतांनी विजयी होणार : बापट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

आता केवळ दहा दिवस उरले आहेत, याची जाणीव ठेवून प्रत्येक तासाचे नियोजन करावे आणि लोकसभेमध्ये जितके मताधिक्य मिळाले त्याच्या दुप्पट मताधिक्य मिळवून देण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी काम करावे.

पुणे कॅन्टोन्मेंट : कॅन्टोन्मेंट मतदारसंघात दिलीपभाऊ कांबळे यांनी प्रचंड काम केले आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी त्यांनी भरपूर कष्ट घेतले. त्यामुळे या मतदारसंघातून सुनील कांबळे किमान 25 हजारांच्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केला.

भाजप-शिवसेना, आरपीआय (ए), रासप, शिवसंग्राम महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री तथा आमदार दिलीप कांबळे, गणेश बीडकर, उज्ज्वल केसकर, आरपीआयचे महेंद्र कांबळे आणि सुनील कांबळे उपस्थित होते.

पक्षाने निवडणुकीसाठी अत्यंत काटेकोर नियोजन केले आहे. प्रत्येक कार्यकर्त्यावरील जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या खांद्यावर दिलेली जबाबदारी योग्य रितीने पार पाडावी. आता केवळ दहा दिवस उरले आहेत, याची जाणीव ठेवून प्रत्येक तासाचे नियोजन करावे आणि लोकसभेमध्ये जितके मताधिक्य मिळाले त्याच्या दुप्पट मताधिक्य मिळवून देण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी काम करावे, असेही बापट यांनी सांगितले.

कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे नगरसेविका अर्चना पाटील, नगरसेविका मनीषा लडकत, माजी नगरसेवक संदीप लडकत, तुषार पाटील, अध्यक्ष जयप्रकाश पुरोहित, संतोष इंदुलकर, आरपीआयच्या संगीता आठवले, नगरसेविका किरण मंत्री, उमेश गायकवाड, कालिंदी पुंडे, प्रियांका श्रीगिरी, रफिक शेख, धनराज घोगरे यांच्यासह भाजप, शिवसेना, आरपीआय (ए) आदी पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Image may contain: 7 people, people smiling, people standing

सोमवार पेठ : सुनील कांबळे यांच्या प्रचार कार्यालयाचे फीत कापून उद्घाटन करताना खासदार गिरीश बापट. सोबत सुनील कांबळे, गणेश बीडकर, दिलीप कांबळे

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- Pune Rain : महाकाय वडाचे झाड पीएमपीवर कोसळले; ड्रायव्हर गाडीतच अडकला!

- मंदीचा सर्वाधिक फटका भारताला; 90 टक्‍के जग कचाट्यात

- Vidhan Sabha 2019 : पदाधिकारी राष्ट्रवादीची; प्रचार भाजप आमदाराचा, झाली बडतर्फ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We will win in Pune cantonment constituency over 25000 votes said Girish Bapat