धार्मिक स्थळांची संपत्ती देशासाठी वापरावी - डॉ. बाबा आढाव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

पुणे  - ""देशातील धार्मिक स्थळांकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे. परिवर्तनवादी राजकीय पक्षांनी ही संपत्ती देशाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी उपयोगात आणावी,'' असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी गुरुवारी व्यक्त केले. 

महापुरुषांची संयुक्त जयंती व भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सम्यक पुरस्कार समितीतर्फे देण्यात येणारा "सम्यक पुरस्कार' डॉ. आढाव यांना आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत साळवे यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष नागेश भोसले, संयोजक ऍड. किरण कदम, अनिल हातागळे उपस्थित होते. राहुल पोकळे, संजय भिमाले, सचिन बगाडे यांना सम्यक युवा गौरव पुरस्कार, तर भाऊसाहेब सोनवणे, सूर्यभान गोरे, भागनबाई जाधव, विजय गायकवाड, डॉ. अरुण कांबळे यांना सम्यक पुरस्कार देण्यात आला. 

आढाव म्हणाले, ""जातीला वैज्ञानिक आधार नाही, हे सत्य मुलांना सांगितले पाहिजे. परिवर्तनाचा क्रांतिकारी कार्यक्रम आता हाती घेतला पाहिजे. अशा रचनात्मक कार्यक्रमातूनच संविधानाची मूल्ये रुजविली जाऊ शकतील.'' 

पोकळे म्हणाले, ""हिंदुत्ववादी संघटना जाती-धर्माच्या नावावर तरुणांची डोकी भडकावत आहेत. त्यातूनच मराठा-दलितांमधील काही वाईट प्रवृत्तीच्या व्यक्ती समाज तोडण्याचे काम करत आहेत, याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.'' 

साळवे म्हणाले, ""फुले, शाहू व आंबेडकरांच्या विचारांना अभिप्रेत असलेले समाज परिवर्तनाचे काम भाई वैद्य, डॉ. बाबा आढाव यांनी केले. हे काम आता नव्या पिढीने हाती घेतले आहे.'' अनिरुद्ध बनकर यांचा "वादळवारा' हा कार्यक्रम यावेळी झाला. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. 

Web Title: wealth of religious places should be used for the country