Rain Update : उपनगरांमध्ये अवकाळी पावसामुळे तारांबळ

विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची तारांबळ
weather update rain forecast cut off electricity rain pun maharashtra
weather update rain forecast cut off electricity rain pun maharashtrasakal
Updated on

पुणे : शहरातील उपनगरांमध्ये विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. काही भागात बराच वेळ विद्युत प्रवाह खंडित झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

weather update rain forecast cut off electricity rain pun maharashtra
Unseasonal Rain : न्याहली येथे बीएसएनएलचा टॉवर कोसळला; आठवडाभरात तिसऱ्यांदा अवकाळी पाऊस

उंड्री-पिसोळीत अवकाळी पावसाची हजेरी

उंड्री- उंड्री-पिसोळी आणि वडकी परिसरात गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवेघाटातील रस्ता निसरडा झाल्याने दुचाकी आणि वाहनचालकांना कसरत करावी लागली. विद्युत प्रवाह खंडित झाल्याने नागरिकांना अंधाराशी सामना करावा लागला. रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने वाहनांचा वेग मंदावला होता. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

weather update rain forecast cut off electricity rain pun maharashtra
Rain News Update : वादळी वाऱ्यांमुळे डोंबिवलीत वीज पुरवठा खंडित

अचानक पावसामुळे अनेकांची तारांबळ

घोरपडी- घोरपडी व वानवडी परिसरात पावसामुळे कामावरून घरी जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका तर मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. घोरपडी गावातील लालबहादूर शास्त्री मार्ग, रेसकोर्स परिसर, एम्प्रेस गार्डन , कवडे मळा परिसरात एक तासांपेक्षा जास्त काळ विद्युत पुरवठा बंद होता. रस्त्यावर काळोख पसरला होता. पावसामुळे रस्त्यावर वाहने घसरून किरकोळ अपघात झाले.

weather update rain forecast cut off electricity rain pun maharashtra
Rain News Updates : उंड्री-पिसोळी, वडकी परिसर अवकाळी पावसाची हजेरी

टेमघर येथे ५९ मिलिमीटर पाऊस

खडकवासला : टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वरसगाव येथे ३४, पानशेत येथे १९ तर, खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ९ मिलिमीटर पाऊस झाला.

मुळशी तालुक्यातील कुंभेरी ३५, ताम्हिणी दावडी येथे १०, दासवे लावासा येथे २१, ताथवडे येथे १३, पवना येथे ३५, भीमाशंकर येथे १२, कात्रज बोगदा ११, भोर तालुक्यातील साखर येथे १२ व शिरवली येथे ११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com