वेब सीरिजमुळे संधी वाढल्या - शिवाजी साटम

चिंचवड - रोटरी क्‍लब ऑफ चिंचवडतर्फे शिवाजी साटम यांना पुरस्कार प्रदान करताना संजय खानोलकर, मल्लिनाथ कलशेट्टी, राजन लाखे, बाळकृष्ण खंडागळे.
चिंचवड - रोटरी क्‍लब ऑफ चिंचवडतर्फे शिवाजी साटम यांना पुरस्कार प्रदान करताना संजय खानोलकर, मल्लिनाथ कलशेट्टी, राजन लाखे, बाळकृष्ण खंडागळे.

पिंपरी - ‘‘वेब सीरिज हा मीडियाचा नवा आविष्कार आहे. यामुळे तांत्रिक, कला, दिग्दर्शन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. प्रत्येक गोष्टीचे स्पेशलायझेशन झाल्याने त्या-त्या क्षेत्रात अधिक चांगल्या प्रकारे काम करता येत आहे,’’ असे मत ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांनी व्यक्त केले.

रोटरी क्‍लब ऑफ चिंचवडतर्फे चिंचवड येथे आयोजित व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी साटम बोलत होते. कलागौरव पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. तसेच, खंडणी दरोडाविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर अस्पत आणि उपनिरीक्षक हरीश माने यांना सेवागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

रोटरीचे अध्यक्ष मल्लिनाथ कलशेट्टी, बाळकृष्ण खंडागळे, राजन लाखे, संजय खानोलकर, बाबासाहेब माने, प्रसाद गणपुले, सुरेंद्र शर्मा हे उपस्थित होते. शिल्पगौरी गणपुले यांनी साटम यांची मुलाखत घेतली. त्यात साटम म्हणाले, ‘‘सुरवातीला २३ वर्षे बॅंकेची नोकरी आणि अभिनय अशी तारेवरची कसरत केली. 

वेळेपूर्वी पोचून काही नाटकांच्या तालमी बॅंकेत केल्या आहेत. अभिनय क्षेत्रात काम कर; पण सगळी आर्थिक गणिते सांभाळून, असा सल्ला आईने दिला होता. त्यामुळे नोकरीची गरज आणि अभिनयाची आवड दोन्ही उत्तम प्रकारे जोपासली.’’ डॉ. वसंतराव देशपांडे, पंडित चंद्रकांत लिमये, बाळ धुरी, लता मंगेशकर, रजनीकांत, पु. ल. देशपांडे यांच्यासह अनेक कलाकारांच्या आणि नाटकांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. रिचा लाखे यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com