आधारकार्डच्या धरतीवर तयार केली लग्नपत्रिका

दत्ता म्हसकर
गुरुवार, 3 मे 2018

जुन्नर - सध्या सर्वत्र लग्नसराईची धामधुम सुरु आहे. लग्नाचे निमंत्रण म्हणून वधु-वराकडून लग्नपत्रिका दिली जाते. या लग्नपत्रिका वेगवेगळ्या पद्धतीच्या व मजकुराच्या केल्या जातात. मात्र, तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करून आधार कार्डाच्या स्वरूपातील लग्नपत्रिका तयार करण्याचे काम जुन्नरमधील संगणक शिक्षक रविकिरण कुंभोजे यांनी केले आहे. त्यांचा विवाह जुन्नरमधील कथ्थक शिक्षिका मयुरी यंदे हिच्याबरोबर 9 मे रोजी ठरला आहे.

आधार कार्डच वाटेल या स्वरूपात कार्डच्या दोन्ही बाजूला लग्नसोहळ्याचा मजकूर छापण्यात आला आहे. तर आधारकार्ड प्रमाणेच त्यावर बारकोड छापण्यात आला असून, त्या बारकोडवर मोबाईल स्कॅनर नेला असता नवदांपत्याचा प्री.वेडींग व्हीडीओ दिसू लागतो. त्यामुळे दांपत्याबद्दलची माहीती व्हीडीओच्या रुपात प्रकट होऊ लागते. पत्रिकेला जोड म्हणून क्यू आर कोड, या प्रणालीचा वापर करुन ही पत्रिका तयार करण्यात आली आहे. त्यामुळे या पत्रिकेच्या वेगळेपणाला चांगलीच दाद मिळत आहे.

Web Title: A wedding card created on the basis of Aadhar card