पुणेकरांनो, Weekend Lockdown संपला, तरी शहरात कडक निर्बंध लागूच

Weekend Lockdown is over but strict restrictions are still in on in the pune city
Weekend Lockdown is over but strict restrictions are still in on in the pune city

पुणे : पुण्यात शनिवार आणि रविवार दोन दिवस लागू करण्यात आलेला विकेंड लॉकडाऊन सोमवारी सकाळी 7 वाजता संपला. त्यानंतर शहरात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने  पुन्हा सुरु झाली. दरम्यान शहरात अद्यापसांयकाळी 6 ते सकाळी 7 या कालावधीत संचारबंदी, तर सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत जमाबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. दरम्यान, सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू
राहणार आहेत. 

राज्य शासनाने 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध जारी करण्यात आले असून त्यानुसार पुणे महापालिकेने सुधारित आदेश काढले आहेत. या आदेशानुसार, जीवनाआवश्यक  दुकाने वगळून सर्व प्रकारची दुकाने आणि अन्य सर्वे सर्व प्रकारची दुकाने वगळून अन्य सर्व प्रकारची दुकाने आणि सेवा येत्या 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सांयकाळी 6 पर्यंत 5 पेक्षा  दास्त नागरिकांना एकत्र येण्यास मनाई आहे. तर सोमवार ते शुक्रवार या कालावधीत संचारबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी होईल.

हेही वाचा - पुण्यात आणखी एका रुग्णाचा बेड न मिळाल्याने मृत्यू; घरातच घेतला अखेरचा श्वास

हे बंद राहणार

- सर्व प्रकारची दुकाने (जीवनावश्यक व अत्यावश्‍यक सेवा वगळता)
- शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवण्या
- पुणे महानगर परिवहन महामंडळाची बससेवा (पीएमपी)
- हॉटेल, बिअर बार, रेस्टॉरंट
- मॉल, चित्रपटगृहे (सिंगल स्क्रीन, मल्टीप्लेक्स), नाट्यगृहे, मनोरंजन पार्क, व्यायामशाळा, जलतरण तलाव, वॉटर पार्क, क्रीडासंकुले, स्पा सेंटर, सलून, ब्युटी पार्लर, केश कर्तनालय, फूडमॉल, आठवडे बाजार
- सर्व धार्मिकस्थळे (मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च अन्य ठिकाणे)
- सरकारी, राजकीय, सामाजिक, खासगी (घरगुती) कार्यक्रमांवर बंदी
- गृहनिर्माण सोसायट्यांसह सार्वजनिक स्वीमिंग पूल, क्लब हाऊस, व्यायामशाळा

सुरू राहणार
- आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे जाहीर अत्यावश्यक सेवा
- जीवनावश्यक वस्तुंची दुकाने
- हॉटेलमार्फत खाद्यपदार्थ पुरवठा सेवा (पार्सल सेवा- सोमवार सकाळी ७ ते शुक्रवारी सायंकाळी ६)
- सर्व भाजी मंडई, दूध
- मेडिकल, आरोग्यविषयक यंत्रणा
- उत्पादन क्षेत्रांतील सर्व उद्योग
- खाद्यपदार्थ विक्री स्टॉल, टपऱ्या (पार्सल सेवा- सोमवार सकाळी ७ ते शुक्रवारी सायंकाळी ६))
- दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ये-जा करण्यास परवानगी
- राज्य परिवहन महामंडळाची बससेवा (एसटी) रेल्वे, विमानसेवा
- ऑनलाइन शिक्षण
- लग्न समारंभ (मात्र ५० लोकांची मर्यादा)
- अंत्यसंस्कार, दशक्रिया विधीसाठी २० जणांना परवानगी
- प्रसार माध्यमेस वृत्तपत्रेस छपाई आणि वितरण
 सहकारी, सार्वजनिक बँका, खासगी बँका, विद्युत कंपनी, आयटी कंपन्या वकील, सनदी लेखापालांची कार्यलये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com