मंचरला देशभक्त हुतात्मा बाबू गेनू प्राणज्योतीचे स्वागत

डी. के. वळसे पाटील
बुधवार, 12 डिसेंबर 2018

मंचर (पुणे) : येथील शिवाजी चौकात बुधवारी (ता. 12) सकाळी देशभक्त हुतात्मा बाबू गेनू यांच्या प्राणज्योतीचे स्वागत उत्स्फूर्तपणे करण्यात आले. हुतात्मा बाबू गेनू अमर रहे. असा जयघोष करण्यात आला. प्राणज्योतीचे हे 11 वे वर्ष आहे.

मंचर (पुणे) : येथील शिवाजी चौकात बुधवारी (ता. 12) सकाळी देशभक्त हुतात्मा बाबू गेनू यांच्या प्राणज्योतीचे स्वागत उत्स्फूर्तपणे करण्यात आले. हुतात्मा बाबू गेनू अमर रहे. असा जयघोष करण्यात आला. प्राणज्योतीचे हे 11 वे वर्ष आहे.

मंचर ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ता गांजाळे, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष संजय थोरात, राष्ट्रवादी कॉंग्रसचे नेते दत्ता थोरात, कॉंग्रसचे नेते जे. के. थोरात, शिवसेनेचे तालुका प्रमुख सुनील बाणखेले, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण भक्ते-थोरात, डॉ. दत्ता चासकर यांच्या हस्ते ज्योतीचे स्वागत करण्यात आले. यावेळी मंगेश बाणखेले, प्रवीण मोरडे, संदीप बाणखेले, मीरा बाणखेले, बाजीराव मोरडे, अॅड. राजू बेंडे पाटील, अरुण लोंढे, अजय घुले, सुरेश निघोट, अरुण बाणखेले, रंगनाथ बाणखेले यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

व्यासपीठावर कामगार नेते अॅड. बाळासाहेब बाणखेले, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर, गणेश खानदेशे यांनी बाबू गेनू यांच्या कार्याची माहिती दिली. मंचर येथे मालती जितेंद्र थोरात यांनी ज्योत आणणाऱ्या तरुणाची नाष्टा व चहाची व्यवस्था केली. त्यानंतर संभाजी चौकातून ज्योत एकलहरे गावाकडे मार्गस्थ झाली.    

बलिदान भूमी काळबादेवी मुंबई येथून हुतात्मा बाबू गेनू यांच्या पुतळ्यापासून मंगळवारी (ता. ११) प्राणज्योतीचा शुभारंभ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चासकर, मनसेचे उपाध्यक्ष अरविंद गावडे, हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर, बाबू गेनू यांचे पुतणे मारुती सैद, इसाम शेख, लंकेश पडवळ यांच्या हस्ते झाला. कामगार मैदान येथे बाबू गेनू यांच्या पुतळ्याचा जलअभिषेक करण्यात आला. आंबेगाव, खेड व जुन्नर तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. "मंचर येथे हुतात्मा बाबू गेनू यांचे स्मारक व्हावे.'' अशी मागणी बाबाजी चासकर यांनी केली. लोणावळा, चाकण, राजगुरुनगर व पेठ येथे ज्योतीचे स्वागत करण्यात आले.

Web Title: Welcome to babu genu pranjyot at manchar