राज्यपालांकडून पंतप्रधानांचे स्वागत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

पुणे - वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (मांजरी) येथे आयोजित केलेल्या "शुगरकेन व्हॅल्यू चेन-व्हिजन 2025 शुगर' या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी पुण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी लोहगाव विमानतळावर स्वागत केले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित होते. भारतीय हवाई दलाच्या विमानाने लोहगाव विमानतळावर सायंकाळी 4.35 वाजता मोदी यांचे आगमन झाले. राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

पुणे - वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (मांजरी) येथे आयोजित केलेल्या "शुगरकेन व्हॅल्यू चेन-व्हिजन 2025 शुगर' या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी पुण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी लोहगाव विमानतळावर स्वागत केले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित होते. भारतीय हवाई दलाच्या विमानाने लोहगाव विमानतळावर सायंकाळी 4.35 वाजता मोदी यांचे आगमन झाले. राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे, आमदार संजय भेगडे, लक्ष्मण जगताप, महापौर प्रशांत जगताप, लष्कराचे मेजर जनरल मनोज ओका, एअर कमांडर ए. के. भारती, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला, जिल्हाधिकारी सौरभ राव यांनीही या वेळी मोदी यांचे स्वागत केले. नियोजित कार्यक्रम संपल्यानंतर सायंकाळी 7.55 वाजता मोदी यांनी लोहगाव विमानतळावरून दिल्लीकडे प्रयाण केले.

Web Title: Welcome to the Prime Minister by the Governor