भिगवण येथे संत चांगावटेश्वर पालखीचे स्वागत 

प्रा. प्रशांत चवरे
मंगळवार, 17 जुलै 2018

टाळ मृदंगाच्या गजरात पालखी सोहळ्याचे गावांमध्ये आगमण झाले. सासवड ते पंढरपुर संत चांगावटेश्वर पालखी सोहळ्याचे येथे आगमण झाले.

भिगवण - संत चांगावटेश्वर पालखी सोहळ्याचे येथील पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर टाळ मृदंगाच्या गजरात पालखी सोहळ्याचे गावांमध्ये आगमण झाले. सासवड ते पंढरपुर संत चांगावटेश्वर पालखी सोहळ्याचे येथे आगमण झाले. ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी अजिंक्य माडगे, उपसरपंच जयदीप जाधव, शंकरराव गायकवाड, दत्तात्रय पाचांगणे, संदीप खुटाळे, जीवन क्षीरसागर, राजेंद्र भिसे आदींनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. टाळ मृदंग व विठ्ठल नामाच्या गजरात पालखी सोहळा भिगवण शहरामध्ये आणण्यात आला. येथील भैरवनाथ मंदिरामध्ये पालखीचा मुक्काम होता तर वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था भैरवनाथ मंदीर, दुगार्देवी मंदीर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे करण्यात आली होती. विविध तरुण मंडळाच्या वतीने वारकऱ्यांसाठी महाप्रसाद व फलाहार ठेवण्यात आला होता. रात्री पालखी सोहळ्याच्या वतीने भजन व कितर्न धामिर्क कायर्क्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Welcome to Saint Changavateshvar Palkhi at Bhigavan