संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे विविध ठिकाणी स्वागत

जनार्दन दांडगे
मंगळवार, 10 जुलै 2018

संत तुकाराम महाराजांच्या पालखीने लोणी काळभोर ग्रामस्थांचा निरोप घेऊन सकाळी आठच्या सुमारास पुढील प्रवासासाठी प्रस्थान केले.

उरुळी कांचन : संत तुकाराम महाराजांच्या पालखीने लोणी काळभोर ग्रामस्थांचा निरोप घेऊन सकाळी आठच्या सुमारास पुढील प्रवासासाठी प्रस्थान केले. थेऊरफाटा, कुंजीरवाडी व सोरतापवाडी येथील ग्रामस्थांची सेवा स्वीकारून दुपारी एक वाजता पालखी उरुळी कांचन (ता. हवेली) गावाच्या हद्दीत पोचली. यावेळी भैरवनाथ सेवा समितीचे अध्यक्ष राजाराम कांचन, कार्याध्यक्ष महादेव कांचन, खजिनदार लक्ष्मण जगताप व गुरुदत्त भजनी मंडळाचे सुरेश कांचन यांनी पालखीला पुष्पहार घालून पालखीचे स्वागत केले. 

पालखी सोहळा थेऊरफाटा येथे येताच महाराष्ट्र राज्य साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, माजी पंचायत समिती सदस्य हिरामण काकडे, श्रीनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप धुमाळ, कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष रोहिदास उंद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वारकऱ्यांना छत्र्यांचे वाटप केले तर सुनीता धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीनी तनिष्का गटाने सुमारे पाचशे कापडी पिशव्यांचे वाटप केले.

पालखी कुंजीरवाडी येथे येताच सरपंच अनुराधा कुंजीर, उपसरपंच दत्तात्रेय कुंजीर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष संतोष कुंजीर यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी पंचायत समिती सदस्या कावेरी कुंजीर, उपस्थित होते. पालखी नायगाव फाट्यावर येताच हनुमंतराव चौधरी काळभैरवनाथ पतसंस्थेच्या अध्यक्षा पूनम चौधरी, उपाध्यक्ष अरुण चौधरी, व्यवस्थापक अनिल जवळकर उपस्थित होते. पेठ फाटा येथे जी. बी. चौधरी फाऊंडेशनच्या वतीने  निलेश चौधरी यांनी पालखीचे स्वागत केले. सोरतापवाडी येथे सरपंच सुदर्शन चौधरी, उपसरपंच स्वाती चोरघे, माजी उपसरपंच गणेश चौधरी यांनी पालखीचे स्वागत केले. तसेच ग्रामपंचायतीने वारकऱ्यांसाठी आरोग्य किट व पिण्याच्या पाण्याचे वापट केले. 

पालखी चौधरी माथ्यावर येताच उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या वतीने 'यशवंत'चे माजी अध्यक्ष के. डी. कांचन, ग्रामपंचायत सदस्य संतोष हरीभाऊ कांचन, सुनिल दत्तात्रेय कांचन, भाऊसाहेब कांचन, रोहित ननावरे, सारीका मुरकुटे, ग्रामविकास अधिकारी के. जी. कोळी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष अमित कांचन, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष आबासाहेब कांचन, डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन, एलाईट ग्रुपचे आकाश छाजेड यांनी पालखीचे स्वागत केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या किर्ती कांचन, महावितरणच्या मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. बुंदेले, उपकार्यकारी अभियंता प्रदिप सुरवसे, मंडलाधिकारी दिपक चव्हाण व त्यांचे सहकारी उपस्थित होते. पालखी सोहळा दुपारी दीड वाजता येथील हनुमान मंदिरात पोहचला. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पालखी यवत (ता. दौंड) येथील मुक्कामासाठी मार्गस्थ झाली.

Web Title: Welcome to the various places of Saint Tukaram Maharajs palakhi