कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्र्यांचे स्वागत

राजकुमार थोरात
शनिवार, 12 मे 2018

वालचंदनगर (ता.इंदापूर) - येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे इंदापूर तालुक्यातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी स्वागत करुन सत्कार केला. 

मुख्यमंत्री फडणवीस आज शनिवार (ता.१२) रोजी माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे विवाहसमारंभासाठी जात असताना जंक्शन चौकामध्ये तालुक्यातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा शाल, श्रीफळ, फेटा व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. 

इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नानासाहेब शेंडे, नियोजन मंडळाचे सदस्य माऊली चवरे, युवा मोर्चाचे जिल्हाउपाध्यक्ष गजानन वाकसे, सुरेश कापडी, नारायण कुलकर्णी, शितल साबळे, शेखर काटे, राजू कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Welcoming the Chief Minister from party workers