esakal | Pune : विद्यार्थ्यांचे गुलाब फूल व चॉकलेट देऊन शाळेत केले स्वागत
sakal

बोलून बातमी शोधा

pune

विद्यार्थ्यांचे गुलाब फूल व चॉकलेट देऊन शाळेत केले स्वागत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सहकारनगर : राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंग स्कूल येथील शाळेत सकाळी रेम्बो सर्कसचे दोन विदूषकाच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुल व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना व पालकांना मास्कचे ही वाटप करण्यात आले.सरकारचे कोरोना विषयक नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांनी काळजी घेण्याची आवाहन करण्यात आले .

यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी,नगरसेवक आबा बागुल,शिक्षण संचालक देवेंद्र शिंग ,अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक,मनपा शिक्षक प्रमुख मीनाक्षी राऊत ,नगर सचिव शिवाजी दौडकर,माजी आमदार मोहन जोशी,मुख्याध्यापक  अश्विनी तांटे,सहाय्यक  शिक्षण अधिकारी जयेश शेंडकर, नंदकुमार बानगुडे, अमित बागूल, रेम्बो सर्कस वाले जोकर इ. उपस्थित होते. आज प्रथम दिवशी शाळेत आठवी व दहावी मधील 80 विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमाचे नियोजन काँग्रेसचे मनपा  गटनेते आबा बागुल यांनी केले.

loading image
go to top