महापालिका प्रशासनाने वाहतूक सुधारणांवर काय केली तरतूद

मंगेश कोळपकर
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

सायकल प्लॅन, पदपथ, पीएमपीच्या बस, बीआरटी, वाहनतळ आदींसाठीची तरतूद वाढणे अपेक्षित होते. सुमारे २५ टक्‍क्‍यांनी तरतूद कमी झालेली दिसते. अशा कारभारातून वाहतूक कोंडीतून मार्ग कसा काढणार? 
- प्रांजली देशपांडे, अभ्यासक

पुणे - शहरातील वाहतुकीच्या प्रश्‍नाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असतानाच महापालिका प्रशासनाने वाहतूक सुधारणांवरील तरतूद तब्बल १२२ कोटी २४ लाख रुपयांनी कमी केली आहे. ‘बस रॅपिड ट्रान्झिट’सह (बीआरटी) अनेक वाहतूक प्रकल्पांना कात्री लावण्यात आली असून, उड्डाण पुलांसाठी मात्र खैरात करण्यात आली आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे खासगी वाहनांना प्रोत्साहन मिळून त्यांची संख्या आणखीनच वाढण्याची चिन्हे आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील वाहतूक सुधारणा करण्यासाठीच्या तरतुदीतच महापालिकेने घट केली आहे. बालभारती-पौड फाटा रस्ता, सिंहगड रस्त्यावरील धायरी पूल, पाषाण- सूस उड्डाण पूल यासाठी गेल्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. यंदाही ती कायम ठेवण्यात आली आहे. सेव्हन लव्हज चौक ते वखार महामंडळादरम्यान दोन उड्डाण पुलांचे नियोजन करण्यात आले असून, त्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या दोन्ही उड्डाण पुलांना लगतच्या भागातील काही रहिवाशांनी, तसेच पुणे मर्चंट्‌स चेंबरनेही विरोध दर्शविला आहे. तरीही या उड्डाण पुलांचा आग्रह काही घटक धरत आहेत. 

डीएसकेंच्या संपत्तीचा लिलाव करण्याबाबत 93 हरकती, सूचना

‘हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रूट’ (एचसीएमटीआर) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी गेल्या वर्षी १५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र या प्रकल्पाचा फेरविचार करण्याचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. याचबरोबर ‘बीआरटी’ रद्द करण्याचे सूतोवाच महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले आहे. त्यामुळे ‘एचसीएमटीआर’ आणि ‘बीआरटी’बाबत पक्षांतर्गत बैठक घेऊन चर्चा करू आणि मगच निर्णय घेऊ, असे महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी सांगत आहेत.

परिणामी, शहरातील वाहतुकीचे प्रश्‍न कधी सुटणार, याबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What the municipal administration Provision does on traffic improvements