जुन्या सायकल शेअरिंग सेवेचे नव्याने उदघाटन कशासाठी ?  नाना काटे

मिलिंद संधान
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

नवी सांगवी ( पुणे ) - पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपळे-सौदागर व पिंपळे गुरव येथे 'सार्वजनिक सायकल सुविधा' प्रकल्प राबविण्यात येणार आहे. उद्या रविवार (ता. २६) रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरिष बापट यांच्या हस्ते अधिकृत उदघाटन होणार आहे. मात्र झूमकार कंपनीने मागिल वर्षी नोव्हेंबर महिण्यात 'स्मार्ट सायकल शेअरिंग सेवा', पीईडीएल 'या नावाने सेवा चालू केला होती. त्याचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विद्यमान नगरसेवक नाना काटे व नगरसेविका शितल काटे यांच्या हस्ते पिंपळे-सौदागर परिसरातील १५ सोसायटीतील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले होते.

नवी सांगवी ( पुणे ) - पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपळे-सौदागर व पिंपळे गुरव येथे 'सार्वजनिक सायकल सुविधा' प्रकल्प राबविण्यात येणार आहे. उद्या रविवार (ता. २६) रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरिष बापट यांच्या हस्ते अधिकृत उदघाटन होणार आहे. मात्र झूमकार कंपनीने मागिल वर्षी नोव्हेंबर महिण्यात 'स्मार्ट सायकल शेअरिंग सेवा', पीईडीएल 'या नावाने सेवा चालू केला होती. त्याचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विद्यमान नगरसेवक नाना काटे व नगरसेविका शितल काटे यांच्या हस्ते पिंपळे-सौदागर परिसरातील १५ सोसायटीतील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले होते. असे असताना जुन्या सेवेला नव्याने प्रकल्प राबविण्याचा घाट पिंपरी-चिंचवड सत्ताधारी भाजपकडून केला जात असल्याचा आरोप नगरसेवक नाना काटे यांनी केला आहे.

नाना काटे म्हणाले, " पर्यावरण व आरोग्याला अनुकूल अशी सेवा पिंपळे सौदागर परिसरात मागील वर्षी झूमकार कम्पनीने  दिली होती. यात सायकलसाठी तासाला रुपये दोन प्रमाणे ' पीईडीएलच्या समर्पित स्टेशन्स 'वरून नागरिक सायकल वापर करत होते. त्यामुळे परिसरात फिरण्यासाठी व कमी प्रदूषण, कमी ट्रॅफिक जाम आणि सर्वात महत्वाचे चांगले जीवन दायी असा प्रकल्प सुरु होता. 

मात्र पालिकेच्या वतीने आता १० रु प्रति तास दराने हाच प्रकल्प पुन्हा कार्यान्वित होत आहे. या प्रकरणात जास्त दराने व जुनाच प्रकल्प पुन्हा राबविण्यात सत्ताधारी भाजपकडून स्मार्ट कामापेंक्षा 'स्मार्ट प्रसिद्धीचा' खटाटोप होत असल्याची खोचक टिपण्णी यावेळी नानांनी केली. 

Web Title: What is the need of inauguration of Cycle Sharing Service? Nana Kate