स्थायी समितीने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी काय घेतला निर्णय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार फरकातील २५ हजार रुपये आगाऊ देण्याचा निर्णय स्थायी समितीने मंगळवारी घेतला. यासंदर्भात तातडीने कार्यवाही करून शिक्षण मंडळासह अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात ही रक्कम जमा करावी, अशी सूचना प्रशासनाला केली.

पुणे - महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार फरकातील २५ हजार रुपये आगाऊ देण्याचा निर्णय स्थायी समितीने मंगळवारी घेतला. यासंदर्भात तातडीने कार्यवाही करून शिक्षण मंडळासह अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात ही रक्कम जमा करावी, अशी सूचना प्रशासनाला केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. त्याच्या शिफारशीनुसार फरकाची रक्कम द्यावी लागणार आहे. मात्र, तो एकरकमी देणे शक्‍य नाही. त्यामुळे या फरकापैकी ५० हजार आगाऊ देण्याची मागणी कामगार युनियनने केली. त्यावर स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा करून २५ हजार देण्याचा निर्णय झाल्याची, माहिती स्थायीचे अध्यक्ष कांबळे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What the Standing Committee decides for officers and employees