Chinchwad Election Result : राष्ट्रवादीचं काय चुकलं? अश्विनी जगताप यांच्या विजयाची ५ कारणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chinchwad Election Result

Chinchwad Election Result : राष्ट्रवादीचं काय चुकलं? अश्विनी जगताप यांच्या विजयाची ५ कारणे

पुणेः ज्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. त्या निवडणुकीचे निकाल आज हाती आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी या निवडणुकीसाठी पुण्यात तळ ठोकला होता. याचा काहीसा परिणाम या निवडणुकीत दिसून आला आहे.

चिंचवडमध्ये भाजपची जागा होती आणि ती जागा राखण्यात भाजपने यश मिळवलं आहे. चिंचवड मतदार संघात खरंतर आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर ही पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्यामध्ये भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर महाविकास आघाडीकरून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

दरम्यान याच वेळी मागील निवडणुकीत दुसऱ्या स्थानावर राहिलेले राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. त्यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता. त्यामुळे तिरंगी लढत ही चिंचवडमध्ये पाहायला मिळाली आहे. त्यामध्ये अश्विनी जगताप या आघाडीवर आहे.

मात्र, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवली होती.

भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या विजयाची काही करणेही दिसून येत आहेत

1. चिंचवड मतदार संघामध्ये अश्विनी जगताप यांनी प्रचार करत असतांना लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर मतं मागितली होती. तर भाजपच्या दिग्गज नेत्यांनी यावेळी प्रचार करत अश्विनी जगताप यांना निवडणूक आणण्यासाठी ताकद लावली होती. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे अश्विनी जगताप यांना मिळालेली सहानुभूती हे एक महत्वाचं कारण आहे.

2. ही जागा महाविकास आघाडीने राष्ट्रवादीला दिली होती. तर याच जागेवर शिवसेना(ठाकरे गट) निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होता. पण महाविकास आघाडीने राष्ट्रवादीला उमेदवारी दिल्यामुळे शिवसेनेच्या राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता.

3. महाविकास आघाडीमध्ये सुसंवाद नाही हे महत्वाचं कारण आहे. सुरवातीला कोणता पक्ष आपला उमेदवार उभा करणार हे निश्चित झालेलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्यातील कोणता पक्ष आपला उमेदवार उभा करणार हे ठरण्यासाठी बऱ्याच वेळ गेला.

४. अगदी शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आला होता. या वेळेत भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली होती.

५. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अंतर्गत गटबाजी दिसून आली. राष्ट्रवादीकडून 2 नावे चर्चेत आली होती. त्या नावावर चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीच्या स्थानिक नेते, कार्यकर्त्यांनी एका नावाला विरोध दर्शवला यामुळे अंतर्गत गटबाजी दिसून आली.