बेवारस वाहनांसाठी‘व्हॉट्‌सॲप’ ग्रुप

Whatsapp
Whatsapp

पिंपरी - वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर व मोकळ्या जागेत धूळखात पडलेली बेवारस वाहने तेथून हलविण्यात येणार आहेत. नागरिकांनी त्यांच्या परिसरात बेवारस वाहन दिसल्यास त्याची माहिती व्हॉट्‌सॲपद्वारे कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी जागरूक नागरिक मंचाचे संयोजक अशोक मंगल यांनी ‘बेवारस वाहने हटवा’ असा ‘व्हॉट्‌सॲप ग्रुप’ तयार केला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून एका महिन्यात नव्वद बेवारस वाहनांची माहिती मिळाली.

वाहतूक कोंडी, पार्किंग समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. महापालिका आणि वाहतूक पोलिस त्यावर उपाययोजना करण्यात कमी पडत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यावर उपाय म्हणून मंगल यांनी कोंडीसाठी कारण ठरलेली रस्त्यावरील बेवारस वाहने उचलण्याचा उपक्रम राबविण्यास सुरवात केली. एखादे वाहन अनेक दिवसांपासून एकाच ठिकाणी उभे असल्याचे दिसून आल्यास त्याचा फोटो आणि ठिकाण व्हॉट्‌सॲप’वर पाठविण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. नागरिक ईमेलवरही माहिती पाठवू शकतात. 

ग्रुपमध्ये ७६ सदस्य कार्यरत आहेत. त्यांनी गेल्या महिन्यात या ग्रुपची स्थापना केली. पुणे, पिंपरी चिंचवड, खराडी आणि मॉडर्न कॉलनी या परिसरातील वाहनांची माहिती त्यांना या माध्यमातून मिळत आहे. वाहनांची माहिती ते पोलिसांच्या कळवितात. या पद्धतीने ३५ बेवारस वाहनांची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. ऑटो क्‍लस्टर मार्गावर एक टेम्पो ट्रॅव्हल ॲम्ब्युलन्स पडून होती. ग्रुपवर याविषयी माहिती मिळताच, ते वाहन त्या जागेवरून हलविण्यात आले. याच पद्धतीने शहराच्या वेगवेगळ्या भागांतील बेवारस वाहनेही हलविण्यात आली. 

महापौर राहुल जाधव यांनीही या ग्रुपच्या कामगिरी दखल घेतली. बेवारस वाहनांवर कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी महापालिका प्रशासनाला केल्या. आकुर्डी, वाल्हेकरवाडी, नेहरू नगर, अजमेरा कॉलनी, पिंपरीगाव, पिंपळे सौदागर, सांगवी, भोसरी आळंदी रोड, पुणे मॉडर्न कॉलनी याठिकाणी बेवारस वाहने आढळली. त्याची माहिती नागरिकांनी या ग्रुपला कळविली.

शहरात महापालिका पार्किंग धोरण राबवत असताना बेवारस वाहनांचे काय? अशा प्रश्‍न उभा राहतो. उच्च न्यायालयाच्या धोरणानुसार अशा बेवारस वाहनांवर पोलिसांनी कार्यवाही करणे आवश्‍यक आहे. परंतु, मनुष्यबळाअभावी ही कारवाई करण्यात अडचण येते. अशावेळी महापालिका मदत करू शकते.
- अशोक मंगल, संयोजक, जागरूक नागरिक मंच

व्हॉट्‌सॲप ग्रुपच्या माध्यमातून बेवारस वाहनांची माहिती मिळाल्यावर त्यावर वाहतूक विभागाच्या पोलिसांना नोडल ऑफिसर नियुक्त केले आहे. वाहतूक पोलिस व आरटीओ अधिकारी मिळून कार्यवाही करतील.
- नीलिमा जाधव, सहाय्यक पोलिस आयुक्त, वाहतूक विभाग

येथे पाठवा फोटो 
शहरातील रस्त्यावर बेवारस वाहने दिसल्यास ९७६५९०६४९८ या हेल्पलाइनवर संपर्क करून गाडी आणि ठिकाण व्हाट्‌सॲप करा. ashokjmangal@gmail.com या ईमेल आयडीवर किंवा यावरही पाठवू शकता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com