विद्यार्थ्यांना गणवेश कधी मिळणार

When students will get uniforms
When students will get uniforms

बारामती : नगरपालिकेच्या शाळेतील जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांना वेळेवर गणवेश मिळणार नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे. नगरपालिकेने शाळा सुरु होण्याच्या एक दिवस अगोदर गणवेशाची निविदा काढून आपली कार्यक्षमता सिध्द केली आहे. गतवर्षीही विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्यास सप्टेंबर महिना उजाडला होता. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होणार असे चित्र आहे. दरवर्षी नगरपालिकेच्या वतीने नगरपालिका शाळातील विद्यार्थ्यांना गणवेशाचे दोन जोड, दप्तर, बूट व सॉक्स असे साहित्य मोफत दिले जाते. नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद केली जाते.

जून महिन्यात शाळा सुरु होणार याची माहिती असूनही नगरपालिका प्रशासन शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहून निविदा प्रक्रीया सुरु करते. यामुळे बारा महिन्यांमधील तीन चार महिने विद्यार्थ्यांना एकतर जुना गणवेश किंवा तो खराब झाला असेल तर दुसरेच कपडे गणवेशाऐवजी परिधान करावे लागतात. गतवर्षीही निविदा प्रक्रीया वेळेवर न झाल्याचे पडसाद उमटले होते. यंदा त्यापासून धडा घेत जानेवारी फेब्रुवारीमध्येच ही प्रक्रीया सुरु करणे गरजेचे असतानाही नगरपालिकेने शाळा सुरु होण्याच्या आदल्या दिवशी निविदा प्रसिध्द करुन कार्यक्षमता दाखवून दिली. 

मुख्याधिकाऱयांची यात जबाबदारी असताना त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांना निधीची तरतूद असूनही प्रशासनाच्या गलथानपणामुळे आता गणवेशाची वाट पाहत बसावी लागणार आहे. याबाबत कारणांची जंत्री यानंतर प्रशासनाकडून पुढे केली जाईल. मात्र, यात ज्यांच्यामुळे दिरंगाई झाली आहे. त्यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर कारवाईची गरज बोलून दाखविली जात आहे.

किमान दोन महिने तरी लागणार

निविदा प्रक्रीया पूर्ण करुन प्रारंभ प्रमाणपत्र दिल्यानंतरही दोन हजार विद्यार्थ्यांना वेगाने गणवेश द्यायचे झाले तरी दोन महिन्यांचा कालावधी लागणार हे उघड आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com