झोपडपट्टीत सुविधा कधी मिळणार? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

वडगाव शेरी - ""विमाननगर- लोहगाव प्रभागातील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्‍न गंभीर आहे. याबाबत सत्ताधाऱ्यांकडून केवळ आश्‍वासन दिले गेले, प्रत्यक्षात काहीच झाले नाही. पाण्यासाठी आजही परिसरातील महिलांना रात्रभर जागावे लागत आहे. परिसराच्या नियोजनबद्ध विकासासाठी भाजपला साथ द्या,'' असे आवाहन भाजपचे राहुल भंडारे यांनी केले. 

विमाननगर- लोहगाव (प्रभाग तीन) मधील भाजपचे उमेदवार राहुल भंडारे, बापूसाहेब कर्णे गुरुजी, श्वेता खोसे- गलांडे आणि मुक्ता जगताप यांनी यमुनानगर, गांधीनगर, सिद्धार्थनगर भागात पदयात्रेद्वारे मतदारांशी संवाद साधला. या प्रसंगी रणधीर भाऊसाहेब, संदीप बारस्कर, अख्तर भाईसाहेब, अमित गाडे, प्रभू देसाई आदी उपस्थित होते. 

भंडारे म्हणाले, ""प्रभागातील वस्त्यांमध्ये लहान मुलांसाठी संस्कार वर्ग, ग्रंथालये हवीत. वडगाव शेरीतील महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षणाचे अत्याधुनिक केंद्र नाही. आरोग्याच्या सुविधाही अपुऱ्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने नागरिकांना खासगी रुग्णालयात जावे लागते. महिला बचत गटांसाठी विकास आराखडाही नाही. सर्वांगीण विकासासाठी, महिला सक्षमीकरणासाठी नियोजन विकास आराखडा तयार करू.'' 

बापूसाहेब कर्णे गुरुजी म्हणाले, ""प्रभागाचा विकास करण्यासाठीचे नियोजन हवे. झोपडपट्टीतील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणे, हा त्यांचा हक्क आहे. त्यांचा हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी भाजप कटिबद्द असून विकासासाठी नागरिकांनी भाजपलाच मतदान करावे.'' 

श्वेता खोसे- गलांडे आणि मुक्ता जगताप म्हणाल्या, ""विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी प्रभागात महिलांसाठी किती स्वच्छतागृह बांधले याची माहिती द्यावी. आज प्रभागामध्ये बोटावर मोजण्याइतकेच स्वच्छतागृहे आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात त्या अपूर्ण आहेत. महिलांना आरोग्याची समस्या भेडसावत असून त्या सोडविण्यासाठी नियोजनबद्द आराखडा तयार करणार आहे.''

Web Title: When will facilitate slum aera