नारळ फुटला पण रस्ता होणार का?

ज्ञानेश्वर भंडारे
मंगळवार, 15 मे 2018

वाल्हेकरवाडी (पुणे) : रावेत औद्योगिक नगरीत  झपाट्याने वाढत असलेले शहर. नियोजित आखणी व स्मार्टसिटी कडे पावलं उचलत चाललेल शहर. रावेत येथील अंतर्गत रस्त्याचे भूसंपादन राहिल्यामुळे रस्ते रखडले आहेत. त्यामुळे मुख्य बीआरटी रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.

वाल्हेकरवाडी (पुणे) : रावेत औद्योगिक नगरीत  झपाट्याने वाढत असलेले शहर. नियोजित आखणी व स्मार्टसिटी कडे पावलं उचलत चाललेल शहर. रावेत येथील अंतर्गत रस्त्याचे भूसंपादन राहिल्यामुळे रस्ते रखडले आहेत. त्यामुळे मुख्य बीआरटी रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.

रावेत येथील सेलेस्टियल सिटी मार्गे शिंदेवस्तीला जोडणारा रस्त्याचा डीपी प्लॅन असूनही रस्ता अडलाय कुठे असा प्रश्न नागरिकांना पडलाय? स्वर्गिय गाव अश्या वर्णन केलेल्या  सेलेस्टियल सिटीतील 5000 लोकांना एक कच्चा रस्ता वापरायला दिला गेला आहे. हा रस्ता बनवून देऊ असे आश्वासन बिल्डरने दिले पण  मनपा अधिकारी आणि लोकसेवक 24 मीटर डीपी रोड आहे व तो लवकरच बांधला जाणार आहे असे नुसते सांगून तोंडाला पाने पुसत आहेत. मग चकरा सुरु होतात प्रशासन कार्यालयाच्या. ़

आमच्या येथे खुप अपघात होत आहेत साहेब, महिला व वयस्करांना रस्ता पार करणे कठीण जातेय साहेब काही तरी करा,अशी विनंती केली जाते.नगरसेवकांचे आश्वासन मिळतात,लवकरच बनवुन देऊयात रस्ता म्हणुन.पण काहीच होत नाही.मग लोक पत्रव्यवहार करतात,पोर्टल वर तक्रार नोंदवतात.रस्त्यासाठी जागा ताब्यात घेण्याचे काम सुरु आहे,ते झाल्यावर रस्ता बनेल अशी हवेत उत्तरे मिळतात.पण पुढे काहीच होत नाही. तुम्ही घर घेण्यापुर्वी रस्ता आहे का नाही का बघितले नाही असे उलट प्रश्न पण विचारले जातात.बघता बघता 4 वर्षे अशीच जातात.पण आज पर्यंत काहीही प्रगती नाहीये.आपल्याकडे एका कामासाठी इतका वेळ का लागतो हे विचारण्याची सोयच नाहीये.अश्या परिस्थितीमुळे गंभीर अपघात झाल्यास कोण जबाबदार आहे? पावसाळ्यापुर्वी हा रस्ता तयार होणे गरजेचे आहे. ह्या वर प्रशासन कधी सक्त पाऊल उचलणार का? 

हा रस्ता बनला तर पुढे रावेत चौकात  होणारा वाहतुकीची समस्या  सहज सुटणार आहेत.रावेतच्या विकासात भर पडणार आहे.नागरिकांचे हाल कमी होणार आहेत.मग ह्या प्रश्नाकडे प्रशासन कधी लक्ष घालणार आहे? का आपला विकास फक्त कागदोपत्री होतो आहे का? असा नागरिकांना प्रश्न पडतोय.

प्रश्न उभा रहतो तो म्हणजे जर नागरिकांना जाण्या येण्यासाठी रोडच नसेल तर बांधकाम परवाना मिळतोच कसा? नागरिकांचे हाल झाले तरी बिल्डर काहीही पावल उचलत नाही.सर्व नागरिक प्राँपर्टी टँक्स वेळीच भरत राहतात, तरीही प्रशासनाच घोडं कुठं अडलय हा प्रश्न आणखीही का सुटत नाही, ह्यावर प्रशासन काहीही अँक्शन घेत का नाही? 

आज जवळपास 5 वर्षे झाली आम्ही येथे राहायला आलो आहोत, अगोदर आम्हाला एक कच्चा रस्ता वापरायला दिला आणि परत तो बंद केला नंतर हा रस्ता वापरावयास दिला. गेली पाच वर्षे हा रस्ता होणार आहे हे ऐकत आलो आहोत. 3 महिन्यांपूर्वी रस्त्याच्या नारळही फुटला, पण आणखीही कामाला प्रत्यक्ष सुरुवात नाही झाली.
- केतकी नायडू, सेलेस्टियल सिटीच्या रहिवासी

रस्ते बांधकाम अतिशय मंद आहे. पहिल्यांदा त्यांनी विद्युत मार्गांसाठी वेगाने खड्डे बनवले आणि मार्गात येणारी झाडं हलवली परंतु गेल्या 2 महिन्यांपासून ते प्रगती नाही. सध्याच्या परिस्थितीत या रस्त्यावर वाहन चालविणे अवघड आहे. तसेच काही आठवड्यांत पावसाळा येत आहे, रस्ताची स्थिती आणखी वाईट होत आहे. काम जलद करण्याकरिता प्रशासनाने जलद पावले उचलावीत.
- लक्ष्मीकांत बुरान, रावेत रहिवासी

रस्त्याची मोजनीचे काम चालू आहे, काही अतिक्रमणे काढायची आहेत, ती झाली की कामाला प्रत्यक्ष सुरवात होईल.
- मोरेश्वर भोंडवे, नगरसेवक

Web Title: when work starts of road in walhekarwadi