अंत्यविधी करायचे कुठे?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

गेल्या शनिवारपासून चार, तर रविवारपासून चार स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार थांबविण्यात आले. त्यामुळे या भागांतील मृतांच्या नातेवाइकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

पुणे - पावसाचा जोर आणि धरणांतील विसर्ग वाढल्याने शहरातील ३७ पैकी ८ स्मशानभूमींना पाण्याने वेढले आहे.

या स्मशानभूमीतील पाण्याची पातळी गेल्या चार दिवसांत सतत वाढत राहिली. त्यामुळे गेल्या शनिवारपासून चार, तर रविवारपासून चार स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार थांबविण्यात आले. त्यामुळे या भागांतील मृतांच्या नातेवाइकांची प्रचंड गैरसोय होत आहे. यामुळे नव्या पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युत आणि गॅस दाहिन्यांत अंत्यसंस्कार करण्याचे प्रमाण वाढले आहे. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) वैकुंठ स्मशानभूमीत गेल्या सहा दिवसांत १५३ मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार झाले आहेत. नेहमीच्या तुलनेत ही संख्या दीडपटीने जास्त आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Where to do the funeral

टॅग्स