"गेला नाला कुणीकडे?"

समीर तांबोळी
सोमवार, 4 जून 2018

उंड्री (पुणे) : सय्यदनगर भागामध्ये नाल्याच्या पात्रात प्रचंड प्रमाणात अतिक्रमणे झाली असून काही ठिकाणी नाला अक्षरश: लूप्त झाला आहे. काही ठिकाणी नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्यात आला आहे, त्यामुळे "गेला नाला कुणीकडे" अशी म्हणण्याची पाळी नागरिकांवर आली आहे.

पावसाळ्यात नाल्याला भरपूर पाणी असते त्यामुळे येथे पुराचा धोका निर्माण झाला असून महापालिका प्रशासनाचे या अनाधिकृत कामांकडे साफ दुर्लक्ष होत आहे. नाल्याचे सर्वेक्षण करून त्याच्या कडे्ला अनधिकृत कामे काढून टाकावीत. अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

अशीच परिस्थिती महंमदवाडी, कृष्णानगर येथे आहे. नाल्याच्या पात्रात कचरा, राडारोडा टाकण्यात आला आहे. त्यामुळे नाल्याचा मार्ग अवरुद्ध झाल्याने पावसाळ्यात नाल्याला पुर येतो. दोन वर्षापुर्वी एक महिला या पुरात वाहून गेली होती. परंतू महापालिकेने या घटनेतून बोध घेतलेला दिसत नाही.

सामाजिक कार्यकर्ते असगर बेग म्हणाले, नाल्याच्या कडेला माती टाकून भर टाकली जाते. तेथे पत्र्याचे शेड उभारले जातात. हे काम वर्षानुवर्षे सुरु आहे. 

सय्यदनगर परिसरातील माहिती अधिकार कार्यकर्ता साजिद शेख म्हणाले, "नाल्याच्या पात्रात प्रचंड प्रमाणात कचरा, राडारोडा टाकला गेला आहे. दोन ते तीन दिवस सतत पाऊस झाल्यास नाल्याचे पाणी वाढून पुर येण्याच्या घटना मागील काही वर्षात वाढल्या आहेत. महापालिका प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष होत आहे.

नाले सफाईचे काम अर्धवटच :
दरम्यान महंमदवाडी कृष्णानगर (आंबेकर मळा) ते हडपसरपर्यंत नाले सफाईचे काम वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने केवळ दोन जेसीबीच्या सहाय्याने सुरु आहे. 5 जून पर्यंत काम पुर्ण करावयाचे आहे अशी माहीती मुकादम गजानन लोंढे यांनी दिली. पावसळ्यापुर्वी हे काम पुर्ण होण्याची शक्यता कमीच आहे. शिवाय नाल्यातून काढलेला कचरा, गाळ हा नाल्यांच्या किनाऱ्यावर टाकला जात आहे. हा कचरा व गाळ उचलला न जाता तसाच ठेवला जात असून जोरदार पाऊस आल्यास हा कचरा व गाळ पुन्हा नाल्यात जाऊन प्रवाह अडण्याची शक्‍यता असून त्यामुळे वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याचा धोका आहे.

Web Title: where is drainage for waste water