राज्यभर अजित पवारांच्या वाढदिवसाचा जल्लोष पण बारामतीत मात्र विरोधात आंदोलन!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

आज राज्यभर अजित पवारांचा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा होत असताना बारामतीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. आपल्या प्रभागातली समस्या सोडवावी यासाठी आमराई भागातील स्थानिक नागरिकांनी नगरसेविका अश्विनी गालिंदे यांना फोन केला. मात्र त्या फोनवर अश्विनी यांचे पती कुणाल आणि स्थानिक नागरिक यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.

बारामती : आज राज्यभर अजित पवारांचा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा होत असताना बारामतीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. आपल्या प्रभागातली समस्या सोडवावी यासाठी आमराई भागातील स्थानिक नागरिकांनी नगरसेविका अश्विनी गालिंदे यांना फोन केला. मात्र त्या फोनवर अश्विनी यांचे पती कुणाल आणि स्थानिक नागरिक यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.

कुणाल यांची पैसे फेकलेत बोलल्याची ऑडिओ क्लिप बारामतीत वाऱ्यासारखी पसरली. इथेच नागरिकांच्या रोषाला वाट मोकळी झाली आणि त्यांनी आज अजित पवार यांच्या वाढदिवशीच बारामती नगरपरिषदेवर मोर्चा काढला.

हमे चाहिये आजादी, राष्ट्रवादी से आजादी… अजित पवार से आजादी… राष्ट्रवादी नगरसेवकों से आजादी… अशा घोषणांनी नगरपरिषद कार्यालयाचे प्रांगण आंदोलनकर्त्यांनी दणादून सोडले. दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष अशा मुजोरगिरीवर काय कारवाई करणार, हे बघावं लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: While Ajit Pawars Birthday protest against NCP Corporator In Baramati