कुत्र्याला वाचविताना तीन तरुण नदीत अडकले

राजेंद्रकृष्ण कापसे
रविवार, 22 जुलै 2018

कोंढवे धावडे : खडकवासला धरणातून मुठा नदीत चार हजार 280 क्यूसेक पाणी सोडले होते. त्यालगत नदीवर असलेल्या पुलाच्या जवळ नदीपात्रात एका खडकावर एक कुत्रे अडकले होते. त्याला काढण्यासाठी तीन युवक गेले अन ते नदीपात्रात अडकले. त्यांना सकाळी आठच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले. 

कोंढवे धावडे : खडकवासला धरणातून मुठा नदीत चार हजार 280 क्यूसेक पाणी सोडले होते. त्यालगत नदीवर असलेल्या पुलाच्या जवळ नदीपात्रात एका खडकावर एक कुत्रे अडकले होते. त्याला काढण्यासाठी तीन युवक गेले अन ते नदीपात्रात अडकले. त्यांना सकाळी आठच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले. 

महेबूब विजापुरकर(वय २०), अजय मराठे(वय २४), सचिन यादव( वय २४)  सर्व राहणार वारजे माळवाडी या तिघांनी नदीतून बाहेर काढले. हे तिघेजण अन्य चारपाच मित्रांसमवेत धरण परिसरात सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आले होते.

खडकवासला धरणालगतच्या पुलाजवळ पूर्वेला नदीत खडकावर एक कुत्र काही तरुणांना दिसले. किनाऱ्यापासून पंचवीस फुट नदीत होते. धरणातून पाणी सोडल्यामुळे नदीच्या किनाऱ्याच्या बाजूला पाणी वाहत होते. त्याला बाहेर येता नव्हते. या तरुणांनी पाण्यातून कुत्र्यापर्यंत जाऊन त्याला ठरविले. पाणी वाहते असल्याने पाण्याला जोर होता. खडक निसरडा असल्याने त्यांना जाता येत नव्हते. अखेर त्यांनी पुलावरून जाणाऱ्या टेम्पोला थांबवून त्यातील दोरी घेतली. ती पुलाच्या कठड्याला बांधून नदीत सोडली. नदीत ते तिघे पाणी नसलेल्या खडकावर उतरले.
दरम्यान, येथील नागरिकांनी अग्निशमन दलास फोन करून कुत्रे अडकले आहे.  त्याला काढायला गेलेले पाण्यात अडकले आहेत. अशी माहिती दिली.

पाण्यातून चालत चालत ते कुत्र्याजवळ पोचले. कुत्रे दोरीला बांधले त्याला त्यांच्या मित्र व नागरिकांनी वर घेतले. मुका प्राणी असलेल्या कुत्र्याचा जीव वाचविणे किंवा त्याला पाण्याबाहेर काढण्यास त्यांना यश आले पण त्या दोरीने त्यांना वर येता येत नव्हतं. पाण्यातून  प्रवाह जोरात होता. अग्निशमनची गाडी पोचली. त्यावेळी, तिघेजण एक खडकावर होते. त्य खडकाच्या चारही बाजूने पाणी वाहत होते. जवानांनी अग्निशमन नियंत्रण कक्षाला कळवून अग्निशमन वाहनावर असलेली जोड शिडी (“एक्स्टेंशन लॅडर”) वापरुन या तीनही तरुणांना दहा मिनिटातच सुखरुप बाहेर काढले.

मेहबूब, अजय व सचिन हे सर्पमित्र आहेत. त्यामुळे, कुत्र पाण्यात अडकलेले पाहून या तरुणांनी त्याला वाचविले पाहिजे बाहेर काढले पाहिजे. असे त्यांच्या मनात आले त्यांनी त्यासाठी प्रयत्न करून ते यशस्वी झाले परन्तु ते पाण्यात अडकले होते. या तरुणांच्या मुक्या प्राण्यावरील प्रेम व धाडस याचे कौतुक तिथे सर्वांनी केले. तसेच सिंहगड अग्निशमन केंद्रांचे प्रमोद मरळ, विलास घडशी, शिवाजी आटोळे, वाहन चालक गणेश ससाणे यांचे ही सर्वांनी व या तीन तरुणांनी आभार मानले.
 

Web Title: while saving the dog, three youths are trapped in the river